हाथरस दुर्घटना : प्रेतांचा खच बघून पोलिसाला ‘हार्ट अटॅक'

Hathras-stampede-UP कर्तव्यावरच झाला मृत्यू

    दिनांक :02-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली/लखनऊ,
 
 
Hathras-stampede-UP उत्तर प्रदेशातील हाथरसमधील रतिभानपूर गावात सत्संग संपल्यानंतर, कथित भोले बाबांची ‘चरणधुलीङ्क घेण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. Hathras-stampede-UP या दुर्घटनेत आतापर्यंत ११६ मृतदेह सापडले असून, त्यात मोठ्या संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे. मृतदेहाचा खच पाहून, एका पोलिसाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला आहे.Hathras-stampede-UP
 
 

Hathras-stampede-UP 
 
 
या मृतदेहांच्या व्यवस्थेचे कार्य क्विक रिस्पॉन्स टीमकडे होते. ड्युटीवर तैनात रवी यादव संवेदनशील मनाचे होते. लहान मुलांचे आणि मृतदेहांची वाईट अवस्था बघून, यादव यांना हार्ट अटॅक आला.Hathras-stampede-UP पोलिस हवालदार असला तरी शेवटी तो माणूसच होता. तुकड्यांमधील मृतदेहांचा तो ढीग बघून, यादव यांना अटॅक आला आणि कर्तव्यावर असतानाच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिस अधिकारी जगदीशचंद्र मौर्य यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
 
 
 
Hathras-stampede-UP दरम्यान, या सत्संगाचे आयोजन करणारा भोले बाबा आणि त्याचे समर्थक फरार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २४ तासांच्या आत घटनेचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ते स्वत: उद्या बुधवारी हाथरसला जाणार आहेत. सत्संग झाला ते ठिकाण शहरापासून बरेच लांब असून, बसगाड्यांमध्ये भरभरून लोक या कार्यक्रमाला आले. तर, दुर्घटनेनंतर बाईकवर, ऑटोतून मृतदेह नेताना दिसून आले. Hathras-stampede-UP या बाबावर लैंगिक शोषणाचाही खटला सुरू आहे, हे उल्लेखनीय!