६ तासांचा थरार...सावंगीत गोठ्यात घुसला बिबट्या

Leopard-Nagbhid Forest नंतर बिबट्याने ठोकली जंगलात धूम

    दिनांक :24-Jul-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
नागभीड, 
 
Leopard-Nagbhid Forest जंगलव्याप्त भाग असलेल्य सावंगी(बडगे) गावात बिबट्याने मंगळवार, 23 जुलै रोजी रात्री शिरकाव केला. सचिन रणदे यांच्या घरालगतच्या गोठ्यात घुसून बकरीला ठार केले. बाहेरील इसमांनी आरडाओरड केली. Leopard-Nagbhid Forest त्यामुळे बिबट्याने गोठ्याच्या लादणीवर ठाण मांडले. बुधवार, 24 जुलै रोजी जवळपास 6 तासाच्या थरारानंतर बिबट्याने कवेलू काढले आणि वनाधिकारी व स्वाब संस्थेच्या चमुला वचमा देत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.Leopard-Nagbhid Forest नागभीड तालुक्यातील तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्रात सावंगी(बडगे) नावाचे गाव असून, या गावालगत गायमुख देवस्थान आहे. हा गाव जंगलव्याप्त भागात असून, येथे नेहमीच वन्यप्राण्यांचे दर्शन होत असते. मंगळवारी रात्री बिबट्या गावात घुसला.Leopard-Nagbhid Forest हेही वाचा : काठमांडूतील विमान अपघाताचा live व्हिडिओ बघा!
 

Leopard-Nagbhid Forest 
 
सचिन रणदे यांच्या गोठ्यात शिरकाव करून गोठ्यातील एका बकरीला फस्त केले. बकरीच्या आवाजाने सचिनच्या वडिलाने आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने गोठ्याच्या लादणीवर ठिय्या मांडला. Leopard-Nagbhid Forest त्यानंतर याबाबतची माहिती वनविभाग व स्वाब संस्थेच्या चमुला देण्यात आली. मंगळवारी रात्रीपासून वनविभाग व स्वाब संस्थेचे पदाधिकारी या गावात दाखल झाले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे आणले. पण, बिबट्याने समयसुचकता बाळगली. सलग तीनदा तो पिंजर्‍याजवळ आला. पण, पिंजर्‍यात न घुसता तो पुन्हा लादणीवर जायचा.
 
 
Leopard-Nagbhid Forest त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे काही कर्मचारी गोठ्यावर चढले. पण, बिबट्यानेही समयसुचकता बाळगत कवेलू काढून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. गावाच्या वेशीवर आता पिंजरे लावण्यात आले असून, वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. नागरिकांना सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. Leopard-Nagbhid Forest भर पावसात बिबट्याला पकडण्यासाठी सब संस्थेचे यश कायरकर, नितीन भेंडाळे, शुभम निकेसर, गिरीधर निकुरे, अमन करकाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, आर.एस.गायकवाड, वनरक्षक राजेंद्र भरणे यांनी अथक परिश्रम घेतले. हेही वाचा : दिल्ली विद्यापीठाचे 8 विद्यार्थी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये!