पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत चमकेल!

Paris Olympics 2024-India चार नवीन खेळांचा समावेश

    दिनांक :24-Jul-2024
Total Views |
 चिंतन
 
- गुरुदत्त वाकदेकर
Paris Olympics 2024-India २६ जुलै रोजी पॅरिसमध्ये खेळांची सर्वात मोठी भव्य जत्रा अर्थात ऑलिम्पिक खेळ सुरू होत आहेत, ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. ३३ व्या उन्हाळी ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा यावेळी अतिशय खास असणार आहे, जो ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात प्रथमच नदीवर होणार आहे. Paris Olympics 2024-India खरं तर, याआधी ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नेहमीच मोठ्या मैदानात किंवा स्टेडियममध्ये आयोजित केला गेला होता, परंतु पहिल्यांदाच हा भव्य कार्यक्रम पॅरिसमधील सीन नदीवर होणार आहे. पॅरिसचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या क्रीडा महोत्सवाला अधिक संस्मरणीय बनवेल. पॅरिसने २०२४ ऑलिम्पिक खेळांना खास बनवण्यासाठी विशेष तयारी केली आहे. Paris Olympics 2024-India फ्रान्सच्या भावनेला प्रतिबिंबित करून, पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांची रचनाही अतिशय खास पद्धतीने केली गेली आहे. प्रत्येक पदकामध्ये आयफेल टॉवरचे खरे लोखंड घातले आहे. Paris Olympics 2024-Indiaसुवर्ण पदकाचे वजन ५२९ ग्रॅम, रौप्य पदकाचे वजन ५२५ ग्रॅम आणि कांस्य पदकाचे वजन ४५५ ग्रॅम आहे.
 
 
 
Paris Olympics 2024-India
 
 
२०२४ च्या ऑलिम्पिक खेळांची विशेष गोष्ट म्हणजे यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल यासारखे काही खेळ ऑलिम्पिकचा भाग नसतील; जे टोकियो ऑलिम्पिकचा भाग होते. यावेळी ऑलिम्पिकमधून हे खेळ काढून टाकण्यात आले असून, चार नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. Paris Olympics 2024-India ब्रेकडान्सिंग ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहे तर स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंगचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या चार नवीन खेळांमध्ये एकही भारतीय खेळाडू पात्र ठरलेला नाही. २०२४ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये ३२ खेळांतर्गत एकूण ३२९ स्पर्धांचे आयोजन केले जाईल. ऑलिम्पिक खेळांची विशेष बाब म्हणजे या खेळांमध्ये महिलांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. ऑलिम्पिक खेळांमध्ये महिलांचा सहभाग पहिल्यांदा १९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसला, जेव्हा ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या एकूण ९९७ खेळाडूंपैकी केवळ २२ महिलांनी ५ खेळांमध्ये (टेनिस, सेलिंग क्रोकेट, अश्वारूढ आणि गोल्फ) भाग घेतला. Paris Olympics 2024-India त्यानंतर २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा या अर्थाने ऐतिहासिक ठरल्या की, पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक क्रीडा स्पर्धेत महिलांनी सहभाग घेतला.
 
 
 
ऑलिम्पिकच्या इतिहासात महिलांनी कोणत्याही ऑलिम्पिकच्या प्रत्येक खेळात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये एकूण सहभागींपैकी सुमारे ४५ टक्के महिला होत्या. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. त्या ऑलिम्पिक खेळातील सर्व सहभागींपैकी सुमारे ४९ टक्के महिला होत्या. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत २६ व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंची संख्या गेल्या वेळेच्या तुलनेत कमी झाली आहे. Paris Olympics 2024-India टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतातील १२४ खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी भारताचे ११८ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असून, गेल्या वेळेपेक्षा यावेळी भारत ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके जिंकण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. केंद्रीय युवा, क्रीडा, श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतातील ४८ महिला खेळाडूंसह एकूण ११८ खेळाडू १६ खेळांमध्ये सहभागी होत आहेत. या ११८ खेळाडूंपैकी २६ ‘खेलो इंडिया'चे खेळाडू आहेत, तर ७२ खेळाडू पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळासाठी पात्र ठरले आहेत. Paris Olympics 2024-India ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने आतापर्यंत एकूण ३५ पदके जिंकली आहेत; ज्यात १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कांस्य पदकांचा समावेश आहे. १९०० मध्ये भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि टोकियो ऑलिम्पिकमध्येच एकूण ७ पदके जिंकली.
 
 
 
टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम होती. १२१ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात भारताने प्रथमच अ‍ॅथ्लेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते, तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये जरी महिला हॉकी संघाला पदक जिंकण्यात यश आले नसले, तरी ज्या उत्साहाने आणि जोशाने सर्व सामने खेळले तेही उत्कृष्ट होते. Paris Olympics 2024-India टोकियो ऑलिम्पिक या अर्थानेही खूप खास होते की, भारताने पहिल्याच दिवशी एक पदक जिंकून ऑलिम्पिकची सुरुवात केली आणि खेळाच्या शेवटच्या दिवशी दोन पदकेही जिंकली. शेवटचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक होता. कारण त्या दिवशी भारताने दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकून नवा इतिहास रचला होता. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सहा पदके जिंकण्याचा भारताचा विक्रम रिओ ऑलिम्पिकमध्ये होता. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकण्यात यश आले होते.
 
 
 
Paris Olympics 2024-India नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले तेव्हा संपूर्ण भारताने ‘वंदे मातरम्' जयघोष केला. खरे तर ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहून भारतातील खेळाची स्थिती व दिशा सुधारण्याच्या आशा पल्लवित झाल्या. यावेळीही ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रासह अनेक भारतीय खेळाडूंकडून सुवर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा मंचाच्या व्यासपीठावर पोहोचण्यासाठी आणि भारताची झोळी पदकांनी भरण्यासाठी भारतीय खेळाडू आपली पूर्ण ताकद दाखवतील, अशी अपेक्षा आहे. Paris Olympics 2024-India नीरज चोप्राव्यतिरिक्त भारताकडे २१ सदस्यीय नेमबाजी तुकडी, पुरुष हॉकी संघ, पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्त्विकसाईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी, दोन वेळची बॉक्सिंग वल्र्ड चॅम्पियन निखत झरीन, बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोरगोहेन, विनेश फोगट यांचा समावेश आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूकडून, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, नेमबाजीमध्ये सिफ्ट कौर समरा, गोल्फमध्ये अदिती अशोककडून पदक जिंकण्याच्या प्रबळ आशा आहेत.
 
 
 
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी ठरला तर तो ऑलिम्पिकमध्ये दोनदा सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. त्याचप्रमाणे पी. व्ही. सिंधूनेही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यश मिळविले तर ती भारताची सर्वात यशस्वी अ‍ॅथ्लिट बनेल. Paris Olympics 2024-India एकूण ८ वेळा सुवर्णपदक आणि १९६० मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकीकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला मोठ्या आशा आहेत. त्याचवेळी त्यांच्या असामान्य प्रतिभेने आणि कोट्यवधी भारतीयांच्या आशीर्वादाने पॅरिसला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून संपूर्ण देशाला मोठ्या अपेक्षा आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आणखी चमकेल आणि संपूर्ण जगात भारताची मान अभिमानाने उंचावेल, अशी आशा नक्कीच करता येईल.