पाकिस्तानचा क्रूर चेहरा विद्रूप करा

Pakistan-Indian Army-attack एकेका जवानाची किंमत

    दिनांक :28-Jul-2024
Total Views |
कटाक्ष
 
 
- गजानन निमदेव
Pakistan-Indian Army-attack पाकिस्तानला प्रेमाची भाषा कळत नाही आणि कळली तरी वळत नाही. कुत्र्याचे शेपूट कधीच सरळ होऊ शकत नाही, हे जसे वास्तव आहे, तसेच पाकिस्तानचे आहे. पाकिस्तान कधीही सुधरू शकत नाही आणि पाकिस्तानला सुधरवायचे असेल तर त्याचे अस्तित्वच संपुष्टात आणावे लागेल. Pakistan-Indian Army-attack पाकिस्तानने गेल्या ४५-४७ दिवसांत जम्मू-काश्मिरात सात दहशतवादी हल्ले घडवून आणले आणि त्यात आपले ११ जवान हुतात्मा झाले. भारतीय सुरक्षा दलांनी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यांना भीक न घालता त्यांना ठार मारले, हे खरे असले तरी वाढते हल्ले चिंताजनक आहे. परवाच, कारगिल विजय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रास येथील हुतात्मा स्मारकाला भेट दिली. Pakistan-Indian Army-attack तिथे बोलताना त्यांनी पाकिस्तानला कठोर संदेश दिला असला तरी आता निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे. सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जशी धडकी भरवली होती, त्यापेक्षाही गंभीर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा चुकीची नाही. हेही वाचा : पाऊस पडतोय; जलधोरण हवे
 
 
 
Pakistan-Indian Army-attack
 
 
Pakistan-Indian Army-attack पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ले करण्याच्या योजनेत बदल केलेला दिसून येत आहे. आधी अतिरेकी आत्मघाती हल्ला करायचे. सशस्त्र अतिरेकी भारतात घुसून आठ-दहा लोकांना मारायचे आणि स्वत:लाही स्फोटात उडवून द्यायचे. पण, आता बदललेल्या रणनीतीनुसार ते जम्मू-काश्मिरात घुसतात, जंगलांमध्ये लपून बसतात आणि घात लावून सुरक्षा दलाच्या पथकांवर अचानक हल्ला करतात. नंतर जंगलात पळून जातात. जंगलात दडून बसलेल्या अतिरेक्यांना शोधूून ठार मारणे तसे कठीण काम आहे. आपले जवान धाडसाने हे काम करीत असले तरी एकेका जवानाची किंमत मोजावी लागणे आपल्याला परवडणारे नाही. गेला दीड महिना जम्मू प्रांत अशांत आहे. लोक चिंतीत झाले आहेत. या दीड महिन्यात ११ जवानांना प्राण गमवावे लागलेत. १० नागरिकांचेही प्राण गेले आहेत. Pakistan-Indian Army-attack जंगलांमध्ये अतिरेकी अजूनही दडून बसले आहेत. ते केव्हा हल्ला करतील याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे लोक चिंताग्रस्त आहेत. दुसरीकडे जंगलात दडलेल्या अतिरेक्यांना शोधताना आपले जवानच हुतात्मा होण्याचा धोका जास्त असल्याने अतिरेकी जिथे लपले आहेत, त्या भागावर ग्रेनेड, मोर्टार फेकले पाहिजेत, गनशिपचा, हेलिकॉप्टरचा वापर केला पाहिजे. देशात संरक्षण तज्ज्ञांचा हाच सल्ला आहे.
 
 
 
हा सल्ला ऐकून सुरक्षा दलांनी काम केले तर आपले नुकसान कमी होईल आणि अतिरेकी मारले जातील. अतिरेकी हल्ले आधीही होतच होते. तेव्हा अतिरेकी आत्मघाती बनून येत होते. एक हल्ला करायचा, त्यात सात-आठ लोकांना मारायचे आणि स्वत:ही मरायचे. पण, आता ते हल्ला करून पळून जात आहेत, पुन्हा दुुसरा हल्ला करीत आहेत, संधी मिळाली तर तिसरा हल्ला करीत आहेत. हे असेच चालू राहिले तर त्यांचे मनोबल वाढेल आणि सुरक्षा जवानांचे मनोबल खच्ची होईल. त्यामुळे सरकारने आता सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठी कारवाई करून जनतेला आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे. भिकेचे कटोरे घेऊन फिरणाऱ्या  पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. Pakistan-Indian Army-attack आता पाकिस्तानकडून जे अतिरेकी भारतात घुसवले जात आहेत, ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. जंगलात राहून कसा हल्ला करायचा, पहाडांवर कसे लढायचे आणि युद्धप्रसंग आला तर काय करायचे, याचे प्रशिक्षण त्यांना पाकिस्तानी लष्कराकडून मिळाले आहे, हे स्पष्ट दिसते आहे. ही बाब लक्षात घेता आपल्या जवानांनाही विशेष प्रशिक्षण देणे आणि मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. ९ जूून रोजी सशस्त्र पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहिला हल्ला केला. रियासी भागातील शिवखोडी येथे हिंदू यात्रेकरूंच्या बसवर अंदाधुंद गोळीबार करून दहा यात्रेकरूंना ठार मारले होते.
 
 
 
तेव्हापासून सुरक्षा दलांनी किमान २५ वेळा ‘सर्च ऑपरेशन' राबविले. पण, एकही अतिरेकी हाती लागला नाही. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. दुसरा हल्ला ११ आणि १२ जून रोजी डोडा व भदरवाह येथील पोलिस व लष्कराच्या अस्थायी शिबिरावर झाला. त्यात आपले ७ जवान जखमी झाले होते. Pakistan-Indian Army-attack हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोध अजूनही सुुरू आहे आणि दुर्दैवाने एकही अतिरेकी हाती लागलेला नाही. ७ जुलै रोजी राजोरी जिल्ह्यातील सुरक्षा चौकीवर तिसरा हल्ला झाला आणि त्यात एक जवान जखमी झाला. पळून गेलेले अतिरेकी अजूनही सापडले नाहीत. दुसèयाच दिवशी ८ जुलै रोजी चौथा हल्ला झाला. कठुआ येथे झालेल्या या हल्ल्यात आपले ५ जवान हुतात्मा झाले. हल्ल्यातील अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी ३ हजार जवान दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. पण, अजूनपर्यंत एकही अतिरेकी पकडला गेला नाही. १६ जुलै रोजी डोडाच्या जंगलात सुरक्षा दलाच्या पथकावर पाचवा हल्ला झाला. घात लावून बसलेल्या अतरेक्यांनी केलेल्या या हल्ल्यात आपले ४ जवान हुतात्मा झाले. त्यात सामील एकही अतिरेकी अजून मारला गेला नाही वा पकडलाही गेला नाही.
 
 
 
Pakistan-Indian Army-attack २२ जुलै रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांंनी राजोरीतील गुदा क्वासमध्ये सहावा हल्ला केला. यात एक जवान जखमी झाला. सातवा हल्ला राजोरीतीलच गलुतीमध्ये झाला. त्यातही एक जवान जखमी झाला. पण, अतिरेकी पकडता आलेला नाही. ही सर्वात मोठी चिंतेची  बाब आहे. गेल्या दीड महिन्यातील सर्व हल्ल्यांचा विचार करता पाकिस्तानने भारताविरुद्ध किती मोठे कारस्थान रचले आहे, याची स्पष्ट कल्पना येते. केरन, गुुरेज आणि उरी सेक्टरमध्ये झालेले घुुसखोरीचे मोठे प्रयत्न पाकिस्तानच्या कटकारस्थानाचा पर्दाफाश करणारेच आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रियाकडून घेतलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानकडून अफगाणयुद्ध प्रशिक्षित अतिरेक्यांना भारतात घुसविले जात असल्याचे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. Pakistan-Indian Army-attack अतिरेक्यांना जम्मू-काश्मिरात घुसवून हिंसाचार माजवायचा आणि दहशत पसरवून अशांतता निर्माण करायची, हा पाकिस्तानचा उद्देश स्पष्ट दिसतो आहे. अतिरेक्यांकडे केवळ अमेरिकी आणि ऑस्ट्रियन शस्त्रेच आहेत असे नव्हे, तर जर्मन आणि चिनी शस्त्रास्त्रेही आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे आणि धोका किती मोठा आहे, हे ओळखून कायमचा बंंदोबस्त करण्याच्या दृष्टीने ठोस कारवाई केली पाहिजे. ही काळाची गरज आहे.
 
 
 
भारतात अतिरेकी घुसवून अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने बॉर्डर अ‍ॅक्शन टीम अर्थात ‘बॅट'ची निर्मिती केली आहे. यातून पाकिस्तानचा किळसवाणा चेहरा पुढे आला आहे. बॅटच्या सदस्यांना भारतीय सीमेत घुसवायचे आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करायचे आणि वरून भारताचे आरोप फेटाळून लावायचे, हा पाकचा उद्योग आता हाणून पाडण्याची वेळ आली आहे. Pakistan-Indian Army-attack बॅटच्या सदस्यांना कठोर प्रशिक्षण देऊन त्यांना अतिशय क्रूर बनविण्याचे पाप पाकिस्तानी लष्कराकडून केले जात आहे. बॅटवाले हे क्रूर अतिरेकी भारतात घुसून कुणालाही ठार मारण्यास मागेपुुढे पाहात नाहीत. ही बाब लक्षात घेता सीमेपलीकडे पाकिस्तानने जे दहशतवादी अड्डे तयार केले आहेत, ते उद्ध्वस्त करण्याची आणि आतपर्यंत घुसून पाकिस्तानला अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. अपेक्षा आहे, लवकरच अशी कारवाई होईल आणि देशातील जनता आश्वस्त होईल. पाकिस्तानचा अतिशय क्रूर चेहरा यानिमित्ताने पाहायला मिळाला. Pakistan-Indian Army-attack असे क्रौर्य दाखवून पाकिस्तानने काय साध्य केले, असा सवाल आपण उपस्थित करू शकतो. पण, त्याला काहीही अर्थ नाही. पाकने जे साध्य करायचे आहे, ते केलेच आहे. पाकिस्तानने अतिशय घृणित कृत्य केले आहे. मानवाधिकाराचे उल्लंघनही केले आहे. पण, याविरुद्ध भारतातल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी जराही आावाज उठविल्याचे ऐकिवात नाही.
 
 
 
दुसरी बाब म्हणजे भारतात राहऱ्या आणि स्वत:ला पुरोगामी ठरवणाऱ्या एकानेही पाकिस्तानचा निषेध करण्याचे साधे देशकार्य पार पाडण्याचेही सौजन्य दाखविलेले नाही. Pakistan-Indian Army-attack भारतात असे घडले असते तर याच पुरोगाम्यांनी स्वत:च्या सरकारला झोडपून काढण्यात मागेपुढे पाहिले नसते. एखादा अखलाख मारला गेला म्हणून बेंबीच्या देठापासून बोंबलणारे स्वयंघोषित पुरोगामी पाकिस्तानातील धार्मिक कट्टरवादाबाबत मात्र चकार शब्द काढत नाहीत. हे आश्चर्यकारक अजिबात नाही. कारण, भारतातले पुरोगामी हे ढोंगी आहेत. त्यांना विशिष्ट पक्ष, विशिष्ट संघटना, विशिष्ट समुदाय यांचा फार राग आहे. मग या लोकांच्या मानवाधिकारावर प्रहार झालेत तरी हे पुरोगामी चकार शब्द काढत नाहीत. केरळात संघ स्वयंसेवकांवर हल्ले होतात, निष्पाप स्वयंसेवक मारले जातात, तरीही स्वयंघोषित पुरोगामी कधीच निषेध करीत नाहीत, हे वास्तव आहे. Pakistan-Indian Army-attack कारण, यांच्या दृष्टीने माणसे कधीच महत्त्वाची राहिली नाहीत. त्यांचा अजेंडाच वेगळा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, हिंदुत्ववादी संघटना यांना झोडपून काढण्यातच ते धन्यता मानतात. मागे कुलभूषण जाधव प्रकरणात खरे तर यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येणे अपेक्षित होते. पण, सगळे कसे मूग गिळून गप्प बसले होते. लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला असता तर सगळे कसे बेंबीच्या देठापासून बोंबलत सुटले असते.
 
 
 
 
पण, त्यांच्या दुर्दैवाने मोदी आणि भाजपाचा दणदणीत विजय झाला अन् सगळ्यांचीच बोलती बंद झाली. तरीही ते जे बोलायचे ते बोलतच आहेत. भाजपाच्या जागा कमी होणे हा मोदींचा नैतिक पराभव आहे आणि आम्ही त्याला विजय मानतच नाही, अशी कोल्हेकुई सुरू आहे. असो. याचा पाकिस्तानशी तसा थेट काही संबंध नाही. पण, हे स्वयंघोषित पुरोगामी देशाचा प्रश्न येतो तेव्हाही सरकारची साथ देत नाहीत, हे दुर्दैवी आहे. Pakistan-Indian Army-attack गतकाळात पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला आणि आईला जी हीन वागणूक दिली होती, त्याचा एका सुरात निषेध होणे अपेक्षित होते. पण, तसे झाले नव्हते. आता पाकिस्तानने आपला खरा चेहरा काय आहे ते जगाला दाखवून दिले आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, शस्त्रास्त्रे पुरवून त्यांना भारतात घुसविले जात आहे. याचे अनेक पुरावे अनेकदा देऊनही आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानवर ठोस कारवाई केली जात नाही, हे भारताचे दुर्दैवच म्हटले पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हा मुद्दा प्रभावीपणे मांडावा आणि आपली बाजू सगळ्यांना नीट समजावून सांगत पाकिस्तानवर दबाव वाढवावा. पाकिस्तानला आणखी काही बाबतीत धडा शिकविण्याची गरज आहे.
 
 
 
Pakistan-Indian Army-attack पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. भारताने अनेकदा प्रत्युत्तर देऊनही पाकिस्तान काही सुधरायला तयार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या सीमेत घुसून तिथे असलेल्या सैनिकांना आणि अतिरेक्यांना ठार मारावे, अशी संतप्त प्रतिक्रिया भारतभर उमटली आहे. नसती उमटली तरच नवल. प्रत्यक्ष रणमैदानात चार वेळा चारीमुंड्या चीत झालेल्या पाकिस्तानला आता मैदानात लढाई करण्याची भीती वाटते. त्यामुळेच पाकिस्तानने भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारले आहे. या छुप्या युद्धातही आता पाकिस्तानला धूळ चारण्याची वेळ आली आहे. वारंवार पाकिस्तानकडून युद्धविरामाचे उल्लंघन केले जात आहे आणि भारताकडून फक्त तोंडी निषेध केला जातो, ही बाब जनतेला पटणारी नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाचा कितीही दबाव असला तरी तो झुगारून भारताने पाकिस्तानवर थेट आक्रमण करावे आणि एकदाचे सगळे प्रश्न निकाली काढावेत, अशी जनभावना आता आकार घेऊ लागली आहे.
 
 
 
 
Pakistan-Indian Army-attack देशातील जनमानस संतप्त आहे. पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात यावा अशा आशयाचा अग्रलेख तरुण भारतने प्रकाशित केला होता. अग्रलेखात तरुण भारतने जनभावनाच व्यक्त केल्या होत्या. त्या जनभावनांचा सन्मान भारतीय लष्कराने पुन्हा एकदा करावा, अशी अपेक्षा आहे. भारतीयांना आता आणखी कठोर कारवाईची अपेक्षा आहे. गतकाळात म्हणजेच, नेहरू पंतप्रधान असताना ज्या चुका भारताने केल्यात, त्यांची पुनरुक्ती आता होऊ नये. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा पाकिस्तानला धडा शिकविला पाहिजे. Pakistan-Indian Army-attack वेळ पडली आणि संधी मिळाली तर जगाच्या नकाशावर पाकिस्तानचे नामोनिशाण राहणार नाही, अशी कृती केली पाहिजे. कारण, पाकिस्तान आता सुधरण्याच्या पलीकडे गेला आहे. देशवासीयांचा ऊर गौरवाने भरून येईल, अशी कृती आता भारताकडून केली जाणे अपेक्षित आहे.