साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :28-Jul-2024
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य 
 
 
Saptahik Rashibhavishy

मेष (Aries) : योजना कार्यान्वित होणार
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्याच राशिस्थानातून सुरू होत आहे, तर आपला राशिस्वामी मंगळ धनस्थानात आहे. ही ग्रहस्थिती अतिशय उत्तम व अनुकूल आहे. या योगाच्या प्रभावाने या आठवड्यात आपल्या व्यवसाय, कामधंद्यास गती मिळेल. वेळेचे नियोजन करून आपण अपेक्षित परिणाम गाठू शकाल. नोकरदारांना काही चांगले अनुभव या सप्ताहात लाभू शकतील. पूर्वी काही योजना आखून ठेवल्या असतील तर त्या आता पुढे आणून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करायला हवा. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील. हेही वाचा : आज क्रिकेटचा डबल डोस, भारत आणि श्रीलंका संघ दिवसातून दोनदा भिडणार
शुभ दिनांक - 29, 30, 31, 2.
 
 
वृषभ (Taurus) : अनुभवींचा सल्ला घ्या
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील व्यय स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी शुक्र या आठवड्यातसुखस्थानात विराजमान आहे. हा काहीसा सुखद व काहीसा खर्चिक योग बनत आहे. एखादी मोठी खरेदी संभव आहे. तरुण वर्गाला नोकरी-व्यवसायात उत्तम संधी, पगारवाढ, पदोन्नतीचे- थोडक्यात भाग्योदयाचे योग दर्शवीत आहे. नवीन गुंतवणूक करता येईल. मात्र, अशी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहार करताना पुरेशी सावधगिरी बाळगा. कामाची दिशा, झपाटा बदलू न देता आगेकूच करण्यातच आपले हित आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - 30, 31, 1, 2.
 
 
मिथुन (Gemini) : गुंतवणूक करताना सावध
Weekly Horoscope :  या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील लाभ स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी बुध पराक्रम स्थानात आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा विविध आघाड्यांवर आपली आगेकूच दर्शविणारा हा सप्ताह आहे. विशेषतः आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात अतिशय उत्तम परिस्थिती आपणास जाणवण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक, लॉटरी वा तत्सम बाबीत गुंतवणूक करताना सावध असावयास हवे. युवा वर्गास मात्र या सप्ताहात प्रेमसंबंध, विवाह योग देण्याची शक्यता आहे. हेही वाचा : दादागिरी...डीलरने मुलीला फेकले छतावरून, VIDEO
शुभ दिनांक - 28, 31, 1, 2.
 
 
कर्क (Cancer) : कुटुंबात आनंदाचे वातावरण
या आठवड्यात आपला राशिस्वामी चंद्राचे भ्रमण कुंडलीतील दशम या प्रथम दर्जाच्या कर्म स्थानातून सुरू होत आहे. हा आपल्या कार्यक्षेत्रात काही महत्त्वाच्या संधी उपलब्ध करून देणारा योग आहे. चंद्राची सुख स्थानावरही दृष्टी येत असल्यामुळे उत्तम यशाची हमी बाळगता येईल. फक्त कोणावरही अवाजवी विश्वास टाकून चालायचे नाही, एवढे पथ्य पाळायला हवे. एखादी मोठी खरेदी वा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी काहींना मोठा खर्च करावा लागू शकतो. कुटुंबात त्यामुळे आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - 29, 1, 2, 3.
 
 
सिंह (Leo) : कार्यक्षेत्रात बाजू वरचढ
Weekly Horoscope :  या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील भाग्य स्थानातून सुरू होत आहे. तर आपल्या राशीत शुक्र व बुध असून राशिस्वामी रवी व्ययस्थानात आहे. या आठवड्यातील ग्रहस्थिती आपल्या योजनांना अतिशय अनुकूल ठरणारी आहे. व्यवसायात, नोकरीत प्रशंसा, कामाचे कौतुक, वरिष्ठांची मर्जी राहील. पैशाची आवक वाढेल. कार्यक्षेत्रात आपली बाजू वरचढ होत असतानाच हाताखालच्या सहकार्‍यांकडून मात्र काहीसे असहकाराचे वर्तन घडण्याची शक्यताही आहे. एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणुकीसारख्या भरीव कामात पैसा जरा मोकळा करावा लागेल असे दिसते.
शुभ दिनांक - 28, 30, 31, 3.
 
 
कन्या (Virgo) : आरोग्याची काळजी घ्या
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील अष्टम या पीडादायक स्थानातून सुरू होत असून आपला राशिस्वामी बुध शुक्रासोबत व्यय स्थानात आहे. या आठवड्यात आपणास बरेच काळजीपूर्वक धोरण आखून पावले उचलावी लागतील. आर्थिक व्यवहारात सतर्क राहावे लागेल. कोणावरही विश्वास टाकून चालणार नाही. काही मंडळींना प्रामुख्याने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काहींना हा सप्ताह कटकटीचा जाऊ शकतो. कायदेशीर बाबतीत अडकला असाल तर परिस्थिती चिघळू देऊ नये. हेही वाचा : महाराष्ट्र, गुजरातसह 17 राज्यांचे हवामान अपडेट जाहीर
शुभ दिनांक - 29, 31, 1, 3.
 
 
तूळ (Libra) : मोठ्या व्यवहारात यश
Weekly Horoscope :  या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीत सप्तम स्थानातून सुरू होत असून आपला राशिस्वामी शुक्र या आठवड्यात लाभ स्थानात बुधासोबत आहे. घर, जमीन वगैरे सारख्या मोठ्या व्यवहारात काम करणार्‍या मंडळींना हा सप्ताह चांगला ठरावा तसेच वाहनासारख्या मोठ्या खरेदीच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी काहींना या आठवड्यात प्रयत्न करता येईल. नोकरी व्यवसायात यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम जावा. विशेषतः शिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या योजना कुणी आखत असेल तर त्याला मूर्त रूप लाभू शकेल. हेही वाचा : ‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’
शुभ दिनांक - 30, 31, 1, 2.
 
 
वृश्चिक (Scorpio) : कामाचे कौतुक, नवी जबाबदारी
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीत सहाव्या स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी मंगळ सप्तम स्थानात आहे. हा योग आपल्या कार्यक्षेत्रात आपण आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचे चीज करून देणारा ठरू शकतो. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक, नवीन जवाबदारी, पदोन्नती, पगारवाढ, इन्सेंटिव्ह अशा स्वरूपात लाभ पदरी पडण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांची मर्जी आणि सहकार्‍यांची साथ लाभणार आहे. व्यवसायातही यश मिळेल. घरात काही शुभकार्ये ठरण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या व कुटुंबाच्या आनंदात भरच पडेल. आर्थिक आवक व सोबतच काहीसा खर्चही वाढण्याचे संकेत आहेत.
शुभ दिनांक - 29, 1, 2, 3.
 
 
धनु (Sagittarius) : प्रलंबित कामांना वेग मिळेल
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पंचम या अतिशय शुभ स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी गुरू सहाव्या स्थानात आहे. हे आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम संधी निर्माण करणारे योग दर्शवीत आहे. तसेच जुनी अडलेली आवक, वारसा हक्क वगैरेची प्रलंबित प्रकरणे या काळात मार्गी लागू शकतात. दीर्घकालीन लांबलेले जमिनीचे व्यवहार तसेच स्थावर मालमत्तेसंबंधीचे व्यवहार पूर्णत्वास जातील. घर, मोठे वाहन यांच्या खरेदीच्या योजना असल्यास त्यांना गती मिळेल. व्यावसायिक जागा, वाहन यांची खरेदी होऊ शकते. हेही वाचा : पाकिस्तानचा क्रूर चेहरा विद्रूप करा
शुभ दिनांक - 29, 31, 1, 2.
  
 
मकर (Capricorn) : व्यावसायिक योजनांना गती
Weekly Horoscope :  या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीत चतुर्थ या सुख स्थानातून सुरू होत आहे. त्याचवेळी आपला राशिस्वामी शनी धन स्थानात आहे. हा आपल्यासाठी उत्तम व सुखवर्धक योग आहे. घर, जमीन, व्यवसायासाठी किंवा स्थावर मालमत्ता खरेदीसंबंधात महत्त्वाच्या घडामोठी होऊ शकतात. काहींच्या या संदर्भातील कर्जाच्या मागणीला पूर्तता लाभेल. व्यवसायाच्या योजनांना वेग येईल. विदेशवारीची तयारी असल्यास ती वेग घेईल. काही मंडळींना तीर्थाटने, सहली घडू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी. हेही वाचा : ऋषभ पंतने पहिल्याच सामन्यात केले अनेक विक्रम
शुभ दिनांक - 29, 30, 1, 3.
 
 
कुंभ (Aquarius) : संमिश्र आठवडा, खर्चवाढ
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पराक्रम स्थानातून सुरू होत आहे, तर आपला राशिस्वामी शनी राशिस्थानातच आहे. हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा ठरण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीस खर्चाचे प्रमाण वाढलेले राहू शकते. कुटुंबात एखाद्या कार्यासाठी आपल्याला खर्च उचलावा लागू शकतो. कदाचित काहींना कर्ज काढावे लागू शकते. मोठी खरेदी, अचानक लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील विरोधक सक्रिय होऊ शकतात. काहींना या सप्ताहात कार्यालयातील ताणतणाव, व्यवसायातील स्पर्धा यांना तोंड द्यावे लागू शकते.
शुभ दिनांक - 30, 31, 1, 2.
 
 
मीन (Pisces) : आर्थिक प्रगती व्हावी
Weekly Horoscope :  या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील धन स्थानामधून सुरू होत आहे. त्याचवेळी आपला राशिस्वामी गुरू पराक्रम स्थानात आहे. हा काळ या राशीच्या मंजळींना प्रगतिकारक जावा. विशेषतः युवा वर्गाला शिक्षण, नोकरी, व्यवसाय या संबंधाने या राशीच्या मंडळींना काही चांगल्या घटना घडताना दिसतील. नोकरी-व्यवसायातील मंडळींना चांगले अनुभव लाभावेत. आर्थिक प्रगती होईल. आवक वाढेल. व्यवसायातील जुनी अडलेली आवक या सप्ताहात मिळू शकेल. वारसा हक्क वगैरेची प्रलंबित प्रकरणे या काळात मार्गी लावता येऊ शकतील.
शुभ दिनांक - 28, 30, 1, 2.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746