आता 'ब्रेकअप'ला माफी नाही...!

BNS-Break Up-relations न्याय संहितेचे कलम ६९ काय आहे?

    दिनांक :04-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
 
 
BNS-Break Up-relations भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन कायदे १ जुलैपासून अंमलात आले आहेत. या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कायद्यानुसार, जोडीदाराला लग्नाचे खोटे वचन देऊन त्याच्यासोबत ब्रेकअप करणे, हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. BNS-Break Up-relations ब्रिटिशकाळातील भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि १८७२ चा भारतीय पुरावा कायदा १ जुलैपासून कालबाह्य झाला आहे. त्याऐवजी भारतीय न्याय संहिता कायद्यासह अन्य नवीन तीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. BNS-Break Up-relations या कायद्यातील तरतुदीनुसार, एखाद्या पुरुषाने आपल्या जोडीदाराशी लग्न करण्याचे वचन दिले आणि त्यानंतर ब्रेकअप केल्यास संबंधित पुरुषाला तुरुंगात टाकले जाऊ शकते.

BNS-Break Up-relations 
 
 
भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ ने धोक्याची घंटा वाजवली आहे. BNS-Break Up-relations या नवीन कायद्याने भारतीय दंड संहिता, १८६० ची जागा घेतली आहे. कायदा समीक्षकांचे म्हणणे आहे की, या नवीन कायद्यातील तरतुदीमुळे सहमतीतील संबंधांना गुन्हेगारी स्वरूप येऊ शकते. त्यामुळे विरोधी पक्षातील काही नेत्यांनी या नवीन कायद्याच्या गैरवापराबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे. BNS-Break Up-relations भारतीय न्याय संहिता कायद्याचे कलम ६९ हे प्रकरण पाचचा भाग आहे, जे महिला आणि बालकांविरुद्धचे गुन्हे परिभाषित करते. कलम ६९ मध्ये म्हटले आहे की, जी कोणी व्यक्ती फसव्या मार्गाने किंवा हेतूपूर्वक एखाद्या स्त्रीला लग्नाचे वचन देईल, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवेल, तर त्याला कारावासाची शिक्षा होईल. BNS-Break Up-relations  जास्तीत जास्त १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. या नवीन तरतुदीत ‘फसवी साधन' मध्ये ‘प्रलोभनं', नोकरी किंवा पदोन्नतीचे खोटे वचन किंवा ओळख खोटी सांगून लग्न करणे हे प्रकार समाविष्ट आहेत.