राहुलबाबा, हे वागणं बरं नव्हे...

Hindu-Rahul Gandhi-LoO राजकीय शहाणपण कधी येणार?

    दिनांक :04-Jul-2024
Total Views |
दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
 
Hindu-Rahul Gandhi-LoO तब्बल दहा वर्षांनंतर राहुल गांधी यांच्या रुपात लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला. १६ व्या आणि १७ व्या लोकसभेत आवश्यक तेवढ्या जागा काँग्रेस पक्षाला मिळू न शकल्यामुळे विरोधी पक्षनेता नव्हता. पहिल्यांदा मल्लिकार्जुन खडगे काँग्रेस पक्षाचे गटनेते होते, तर दुसऱ्यांदा ही जबाबदारी अधीररंजन चौधरी यांच्याकडे होती. Hindu-Rahul Gandhi-LoO यावेळी पहिल्यांदाच लोकसभेत ९९ जागा जिंकल्यामुळे काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला, तसेच विरोधी पक्षनेतेपदही मिळाले. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधी यांचे नाव सुचवले. Hindu-Rahul Gandhi-LoO आतापर्यंत सर्व जबाबदाऱ्यांपासून पळ काढणाऱ्या पण अधिकार गाजवणाऱ्या राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले. विरोधी पक्षनेतेपदामुळे राहुल गांधी यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आणि अन्य आवश्यक सुविधा मिळाल्या आहेत. Hindu-Rahul Gandhi-LoO राहुल गांधी या पदाला न्याय देऊ शकतील का, अशी शंका तेव्हाच घेतली गेली, आणि ती खरीही ठरली. आपण विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्र आणि सक्षम नसल्याचे राहुल गांधी यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणातून दाखवून दिले.
 
 

Hindu-Rahul Gandhi-LoO  
 
 
Hindu-Rahul Gandhi-LoO देशाला विरोधी पक्षनेत्यांची दर्जेदार परंपरा लाभली आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांनीही लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद जबाबदारीने सांभाळले, मात्र विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या लोकसभेतील पहिल्याच परीक्षेत राहुल गांधी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळेच अनुत्तीर्ण होण्याचा जागतिक विक्रम राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. अनेकवेळा काही व्यक्तींमुळे त्या पदाचा मानमरातब आणि प्रतिष्ठा वाढत असते, काही वेळेला पदामुळे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा उंचावत असते. Hindu-Rahul Gandhi-LoO राहुल गांधी हे यात दुसऱ्या वर्गवारीतील आहे. विरोधी पक्षनेतेपदामुळे राहुल गांधींचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावली असली तरी विरोधी पक्षनेतेपदाचे मात्र अवमूल्यन झाले, असे अतिशय नाईलाजाने म्हणावेसे वाटते. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे रामभटाची... असे जाणवते आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून आपले पहिले भाषण केले.
 
 
 
विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर हल्ला करायला हरकत नव्हती. पण राहुल गांधी यांनी कारण नसताना देशातील समस्त हिंदू समाजाला हिंसक ठरवले. एकीकडे आपण हिंदू असल्याचा आव ते आणतात, दुसरीकडे हिंदू समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, याला राजकीय शहाणपणा म्हणता येणार नाही. Hindu-Rahul Gandhi-LoO आधीच मुस्लिम तुष्टीकरणाच्या तसेच सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली काँग्रेसने हिंदू समाजावर अन्याय केला, त्याला जबरदस्तीने आपल्यापासून दूर लोटले. आता तर हिंदू कधीच परत काँग्रेसजवळ येणार नाही, अशी व्यवस्था केली. राहुल गांधी यांच्या पूर्वजांचा नेमका धर्म कोणता हा संशोधनाचा विषय म्हटला पाहिजे. राहुल गांधींचे पूर्वज हिंदू आहे, मुस्लिम आहे की ख्रिश्चन आहेत, याचा शोध घेण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती वा संयुक्त सांसदीय समिती नेमण्याचीच वेळ आली आहे. Hindu-Rahul Gandhi-LoO कारण, राहुल गांधीं यांची आतापर्यंतची कोणतीच वागणूक ते हिंदू आहे, वा हिंदूंच्या जवळचे आहे, हे दर्शवणारी राहिली नाही. हिंदूंना आपल्याजवळ आणता येत नसेल तर हरकत नाही, पण किमान दूर तरी न लोटण्याचे राजकीय शहाणपण काँग्रेसला आणि राहुल गांधींना कधी येणार, हा मोठा प्रश्न आहे. मुळात शहाणपण आणि राहुल गांधी यांचा दूरदूरपर्यंत कोणताच संबंध नाही. एका राजकीय पक्षाचा नेता म्हणून देशातील सर्व धर्माच्या लोकांशी किमान सारखे संबंध तरी राहुल गांधी यांनी ठेवायला पाहिजे.
 
 
 
गेल्या काही वर्षांत देशातून काँग्रेस पक्ष जो रसातळाला गेला, त्याचे खरे आणि एकमेव कारण म्हणजे या पक्षाची हिंदूंशी असलेली नाळ तुटली, हे आहे. जोपर्यंत काँग्रेस पक्ष देशातील हिंदूंना आपल्या जवळचा वाटत होता, तोपर्यंत तो देशात आणि देशातील अनेक राज्यांतही सत्तेवर होता. पण शहाबानो प्रकरण आणि रामजन्मभूमी आंदोलनानंतर काँग्रेस पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांच्या जवळ गेला आणि हिंदूपासून दुरावला गेला. Hindu-Rahul Gandhi-LoO त्यात देशातील समस्त हिंदू हिंसक असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची नेहमीसाठी कबर खणली आहे. राहुल गांधी यांनी १८ व्या लोकसभेत केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात सांसदीय मर्यांदाचा भंग करताना विरोधी पक्षनेतेपदाची मानमर्यादाही घालवली आहे. सामान्यपणे सभागृहात भाषण करताना ते अध्यक्षांना उद्देशून आणि त्यांच्याकडे पाहात करावे लागते. अधूनमधून सत्ताधारी पक्षाकडेही पाहात त्यांच्यावर टीका करायलाही हरकत नसते, पण राहुल गांधी यांनी आपले बहुतांश भाषण विरोधी बाजूंच्या सदस्यांकडे पाहात केले. आपण लोकसभेत नाही तर एखाद्या जाहीर सभेत भाषण करत आहोत, असा त्यांचा आविर्भाव होता.
 
 
 
 
Hindu-Rahul Gandhi-LoO आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधी यांनी आपले बहुतांश भाषण अध्यक्षांंच्या आसनाकडे पाठ दाखवत केले, सत्ताधारी बाजूच्या एका मंत्र्याने यावर आक्षेपही घेतला होता. पण तरीही त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही. विरोधी पक्षनेत्याने आरोप करताना आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ पुरावेही सादर करायचे असतात, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आरोप तर ढिगभर केले, पण त्याच्या समर्थनार्थ एकही पुरावा ते सादर करू शकले नाही. त्यामुळेच त्यांच्या भाषणातील काही वादग्रस्त भाग कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याचे आदेश अध्यक्ष ओम बिर्ला यांना द्यावे लागले. मंगळवारी धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ घालण्याची विरोधी पक्षांची कृती तर पूर्णपणे निषेधार्ह तसेच अस्वीकार्य म्हणावी लागेल. Hindu-Rahul Gandhi-LoO राहुल गांधी यांनी चिथावणी दिल्यामुळे विरोधी बाजूंच्या विशेषत: कॉंग्रेसच्या सदस्यांनी वेलमध्ये उतरत केलेली घोषणाबाजी आणि घातलेल्या गोंधळाचे नंगानाच या शब्दातच वर्णन करावे लागेल.
 
 
 
विरोधी बाजूचे सदस्य वेलमध्ये उतरत सत्ताधारी बाजूला आले, एवढेच नाही तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या तोंडासमोर येत त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचाही प्रयत्न केला, याचे कोणत्याही स्थितीत समर्थन करता येणार नाही. विशेष म्हणजे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्या अशा कृतीबाबत जाहीरपणे सभागृहात नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते म्हणून जो संयम, सांसदीय नियमांची जाणीव, समज आणि प्रगल्भता याची गरज असते, तिचा राहुल गांधी यांच्यात पूर्ण अभाव वारंवार जाणवत होता. Hindu-Rahul Gandhi-LoO आपल्या बालिश कृतीने राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा आब आणि मर्यादा पूर्णपणे घालवली. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला, बालकबुद्धी म्हणून त्यांची निर्भत्सना केली. त्यामुळे आता तरी राहुल गांधी यांचे डोळे उघडतील, त्यांना राजकीय शहाणपण येईल आणि ते अधिक जबाबदारीने वागतील, अशी अपेक्षा करायची का?
९८८१७१७८१७