'मां तुझे सलाम'...वानखेडेवरचा अंगावर शहारे आणणारा व्हीडिओ!

    दिनांक :05-Jul-2024
Total Views |
मुंबई, 
Ma Tujhe Salaam video in Wankhede भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून T20 विश्वचषक 2024 ट्रॉफी जिंकली. त्यानंतर खराब हवामानामुळे भारतीय खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये अडकले होते. आता यानंतर टीम इंडियाचे खेळाडू विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचले. जिथे त्यांनी पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. जिथे विजयी परेड काढण्यात आली आणि शेवटी खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला. विजय परेडनंतर भारतीय खेळाडू वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. संपूर्ण स्टेडियम भारत-भारताच्या घोषणांनी दुमदुमले. सर्व भारतीय खेळाडूंनी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील मैदानाचा फेरफटका मारला. यावेळी मैदानात चाहत्यांचा महापूर पाहायला मिळाला आणि सर्व चाहत्यांना हा आनंदाचा क्षण जगायचा होता. हेही वाचा : जसप्रीत बुमराहचे निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य!
 
 
vande
 
हेही वाचा : तुम्ही तुमच्या चिमुकल्याला 'फास्टफूड' देता का? बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये 'मां तुझे सलाम' हे गाणे वाजत आहे. यावर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांचा ताळमेळ आहे. स्टेडियममध्ये उपस्थित असलेले बाकीचे चाहते त्याला चांगली साथ देत आहेत. Ma Tujhe Salaam video in Wankhede व्हिडिओमध्ये कुलदीप यादवच्या हातात ट्रॉफी आहे. रोहित शर्मा त्याच्या खांद्यावर हात ठेवून आहे. कोहलीने खांद्यावर तिरंगा धारण केला आहे. त्यानंतर सर्व खेळाडू आणि चाहते माँ तुझे सलाम गाताना दिसतात. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   हेही वाचा : ब्रेकिंग न्यूज...नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांत बोकारे!