शरद पवारांचा छुपा चेहरा सुप्रिया सुळे

Sharad Pawar-Supriya Sule शरद पवार ८३ वर्षांचे आहेत

    दिनांक :05-Jul-2024
Total Views |
प्रासंगिक 
 
- मोरेश्वर बडगे
Sharad Pawar-Supriya Sule जगात कुठेना कुठे युद्ध सुरू असते तसेच आपल्या देशात कुठे ना कुठे निवडणूक सुरू असते. निवडणूक नाही, राजकारण नाही. लोकसभा निवडणूक आटोपली, पण निवडणुकी आटोपल्या नाहीत. Sharad Pawar-Supriya Sule आठ दिवसांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला एक निवडणूक आहे. ठाकरे गटाने जास्तीचा पण तगडा उमेदवार दिल्याने पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. पुढे तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. Sharad Pawar-Supriya Sule त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका आहेत. पुढे पालिका आणि जिल्हा परिषदेच्याही येतील. या प्रत्येक निवडणुकीत सामान्य माणूस एखादे युद्ध लढावे तसल्या आवेशाने उतरतो. आताही उतरेल. लोकसभा निवडणुकीत भाजपाला थोड्या जागा कमी पडल्या. Sharad Pawar-Supriya Sule पण मित्र पक्षांना सोबत घेऊन मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. इंडिया आघाडीने चेहरा दिला नव्हता. मात्र, आता विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याने होऊ नये, अशी मागणी करून उद्धव गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे.
 
 
Sharad Pawar-Supriya Sule
 
राऊतांनी कोणाचे नाव घेतले नाही; पण उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पुढे करूया, असेच त्यांना सुचवायचे आहे. ‘एक अनार और सौ बिमार' अशी महाआघाडीमध्ये स्थिती आहे. Sharad Pawar-Supriya Sule काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर कधीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. विधानसभेला १०० जागा लढायला मिळाव्या, असे बोलून पटोले मोकळे झाले. शरद पवारांचे वक्तव्य त्यांच्या स्वभावाला साजेसे आहे. सामूहिक नेतृत्व हाच आमच्या महाआघाडीचा चेहरा आहे, असे पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशाने महाआघाडीच्या नेत्यांची हिंमत वाढली आहे. Sharad Pawar-Supriya Sule उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपद पूर्ण भोगण्याची इच्छा अपूर्ण राहिली. अडीच वर्षांतच त्यांना उठावे लागले. मुख्यमंत्री होण्यासाठी पाच वर्षांपूर्वी त्यांनी भाजपा या आपल्या जुन्या मित्राशी नाते तोडले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बसले. त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आता महाआघाडीमधील तिन्ही पक्ष लढायला जास्त जागा मागताहेत. Sharad Pawar-Supriya Sule त्यामागे मुख्यमंत्री होण्याची प्रत्येकाची छुपी इच्छा आहे. आपल्या मुलीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याचे शरद पवारांचे स्वप्न आहे.
 
 
 
सुप्रिया सुळे चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत. पण त्या स्वतःचे नेतृत्व सिद्ध करू शकलेल्या नाहीत. शरद पवारांच्या कन्या म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. या निवडणुकीत तर पित्याला ५० वर्षांतली सारी पाप-पुण्याई खर्च करावी लागली तेव्हा जुगाड जमले. काँग्रेसलाही सुप्रिया चालणार नाहीत. Sharad Pawar-Supriya Sule जनतेतही त्यांचे स्वागत होईल अशातला भाग नाही. महाआघाडीला मिळायच्या त्याही जागा मिळणार नाहीत. जास्त जागा जवळ असतानाही शरद पवारांनी एकेकाळी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडले होते. विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री झाले होते. अजितदादांना मुख्यमंत्री करायचे नव्हते म्हणून शरद पवारांनी ती खेळी केली. त्या बदल्यात मलाईची खाती घेतली. आज शरद पवार ८३ वर्षांचे आहेत. या वयात काका बारामती पिंजून काढत आहेत. Sharad Pawar-Supriya Sule उद्धव ठाकरे किंवा नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्यासाठी काका आता पावसात भिजणार नाहीत. त्यांना मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी पवार कुठल्याही थराला जाऊ शकतात. पवार आज सामूहिक नेतृत्वाची भाषा करीत असले, तरी त्यांचा असली चेहरा विधानसभा निकालानंतर समोर येईल.
 
 
 
विधानसभा निवडणुकीत काय घडणार त्याचे ट्रेलर येत्या १२ जुलैला ११ जागांसाठी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत दिसेल. उद्धव ठाकरेंनी आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांना उभे केल्याने या निवडणुकीत चुरस आली आहे. Sharad Pawar-Supriya Sule तसे पाहिले तर मिलिंद  नार्वेकर हे नेते नाहीत, वक्ते नाहीत; मात्र उद्धव यांचे विश्वासू निष्ठावंत सचिव आहेत. सर्वच पक्षात त्यांचे उत्तम संबंध आहेत. थोडक्यात त्यांची असली ओळख द्यायची तर तिकडचे प्रफुल्ल पटेल आहेत. त्यांना मैदानात आणून उद्धव काय सध्या करू इच्छितात ते पाहायचे. या निवडणुकीत गुप्त मतदान असते. म्हणजे कोणीही कोणालाही मतदान करू शकतो. त्यामुळे मतं फुटणार हे नक्की. आता कोणाची मतं फुटतात; महाआघाडीची की महायुतीची? ते निकालात कळेल. पण मतं फुटली तर महाआघाडी किंवा महायुतीचा, कोणाचा तरी एक उमेदवार पडणार आहे. दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.Sharad Pawar-Supriya Sule
 
 
 
 
अशाच निवडणुकीत महाआघाडीची मतं फुटली आणि भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ठाकरे सरकार कोसळले. इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? हल्ली राजकारणाचा चिखल झाला आहे. दगाफटका होऊ शकतो. पण एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हेही कच्च्या गुरूंचे चेले नाहीत. Sharad Pawar-Supriya Sule महायुतीला मात्र सावध असावे लागेल. कारण ही साधी निवडणूक नाही. शिंदे सरकारची प्रतिष्ठा अडकली आहे. महायुतीला आपले ९ उमेदवार निवडून आणण्यासाठी १६ मतं कमी पडत आहेत. महाआघाडीला ५ मतं कमी पडत आहेत. नार्वेकरांनी माघार घेतली नाही तर अवघड काम आहे. कारण नार्वेकर यांना ‘ऑल पार्टी माणूस' मानले जाते. कोणाचे आमदार फुटतात यावर सारा खेळ आहे. या निवडणुकीत जो निकाल येईल ती हवा पुढे चालू राहणार आहे.Sharad Pawar-Supriya Sule त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक छोटी असली, तरी महाप्रतिष्ठेची झाली आहे.
 
 
 
लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ जागा होत्या. त्याही वाटताना महाआघाडी आणि महायुती दोघांची दमछाक झाली. विधानसभेत तर २८८ जागांचे वाटप करायचे आहे. प्रत्येक घटक पक्षाला ८० ते १०० जागा हव्या आहेत. मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगायला किमान १०० जागा तर लढवायलाच हव्यात. त्यामुळे रुसवे-फुगवे होणारच. Sharad Pawar-Supriya Sule महायुतीतही इशारे सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला लोकसभेची अवघी एक जागा जिंकता आली. मात्र ते ८० जागा मागत आहेत. आम्हाला शिंदे  गटाच्या बरोबरीत जागा मिळायला पाहिजेत, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. दादा गटाच्या नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर त्यांना खरेच महायुतीतून बाहेर पडायचे वेध लागले आहेत का, असा प्रश्न पडतो. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची वक्तव्ये तर भयंकर आहेत. महायुतीत दादा नकोत, असाच शिंदे गटाच्या नेत्यांचा सूर ऐकू येतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार, असे फडणवीस यांनी मागेच जाहीर केले आहे.
 
 
 
Sharad Pawar-Supriya Sule शिंदेंचे नेतृत्व म्हणजे तेही १०० जागा मागणार. मग भाजपाला किती जागा शिल्लक राहतील? गेल्या निवडणुकीत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले होते. तेवढ्या जागांवर तर भाजपा हक्क सांगणारच. इच्छुकांची संख्या मोठी असेल. सत्तेची नशा काही वेगळी असते. त्यामुळे खूप बंडखोऱ्या होतील. एकेका जागेसाठी तीन-तीन, चार-चार तगडे उमेदवार भिडताना दिसतील. पुरेशा जागा मिळाल्या नाहीत तर काँग्रेस बाहेर पडू शकते. Sharad Pawar-Supriya Sule अजितदादाही टोकाचा निर्णय घेऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत योग्य वेळी उमेदवार ठरले नाहीत त्याचा फटका भाजपाला बसला. १५० विधानसभा मतदारसंघांमध्ये महाआघाडीला लीड आहे. त्यामुळे भाजपाला यावेळी आपली रणनीती आखताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.