हाच का आमचा संस्कार?

    दिनांक :06-Jul-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Opposition leader Ambadas Danve महाराष्ट्राच्या विधिमंडळात नव्हे, ज्येष्ठांचे सभागृह असलेल्या सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्याने आई-बहिणींवरून केलेली अश्लील शिवीगाळ ही केवळ सभागृहच नव्हे, तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी ठरली. माता-भगिनींचा अपमान करणारी ठरली. सार्‍यांनी या घटनेचा निषेध आणि निंदा केली. मात्र, दोन महाभाग असे निघाले; त्यांनी मात्र या व्यक्तीची पाठराखण केली. आता एक तर, याच विचारसरणीचा असल्याने त्याने पाठराखण करावी, याच फार आश्चर्य वाटण्यासारखे नाही. मात्र, दुसरा छत्रपतींचं नाव घेतो, छत्रपतींच्या नावे पक्ष चालवतो. आता अलिकडे स्वतःला शाहू-फुले-आंबेडकरांचा अनुयायी संबोधायला सुरुवात केली आहे. मग शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांनी माता-भगिनींचा अवमान करणार्‍यांना पाठीशी घातल्याचे कधी ऐकिवात आहे? यांच्या विचारावर, आदर्शांवर चालणारा हा दुसरा महाभाग महिलांचा अवमान करणार्‍याला पाठीशी घालताना दिसला. यापूर्वी पहिल्या महाभागाला असेच पाठीशी घातले होते. या सर्व गोष्टींचा एकूणच सार काय निघतो, तर राजकारणासाठी शिवाजी महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई, शाहू, फुले, आंबेडकरांचा जप करायचा. मात्र, यांची खरी विचारसरणी, संस्कृती आणि संस्कार काय? हे कृतीतून वेळोवेळी जगासमोर येतच असते. हेही वाचा : गडचिरोलीत माओवाद्यांनी केला IED स्फोटाचा प्रयत्न
  
 
Danve
 
यापूर्वी महिलांना लज्जित करणार्‍या घटना झाल्या नाहीत अशातला भाग नाही. पण अलिकडल्या काळातल्या घटना काही महत्त्वाची लोकं, लोकप्रतिनिधी, नेते, समाजावर परिणाम होईल अशा प्रभावी पदावर असलेल्यांकडून केल्या गेल्याने जरा ठळकपणे गाजल्या. सार्वभौम सभागृहाचा आणि महिलांचा नितांत आदर करण्यात सर्वात अग्रेसर असलेला महाभाग म्हणजे, एका सभागृहाचा मागच्या दरवाजाने जाणारा स्वयंघोषित नेता संजय राऊत होय. आता या महाभागाच्या पावलावर पाऊल टाकत यांच्याच गटाचे विरोधी पक्षनेता या संवैधानिक पदावर असलेला विधान परिषद सभागृहाचा Opposition leader Ambadas Danve विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी आघाडी घेतल्याचे पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने बघायला मिळाले. यापूर्वी विधिमंडळाला चोरमंडळ संबोधून सार्वभौम सभागृहाचा अपमान करणार्‍या संजय राऊतांनंतर त्यांच्याच गटाच्या अंबादास दानवेंनी भर सभागृहात आई-बहिणीवरून दुसर्‍या सभासदाला शिवीगाळ केली. सभागृहाची काही आचारसंहिता असते, संसदीय-असंसदीय शब्दांची व्याख्या केलेली असते. साधारणतः राजकीय जीवनात जगत असताना काही आचारसंहिता स्वतःहून पाळली पाहिजे. बरं, दानवेंनी केलेल्या शिवीगाळीच्या घटनेनंतर येथे दोन गोष्टी जरा खटकतात. पहिली म्हणजे दानवेंचा आक्षेप काय होता? माझ्याकडे बोट दाखवून बोलायचं नाही. सभापतीकडे दाखवायचं. बरं, हे सांगताना स्वतः अंबादास दानवे मात्र ज्याला हा मोलाचा सल्ला देत होते त्याच्याकडे बोट दाखवूनच बोलत होते, हे विशेष, बरं का...! पण बोट दाखवून बोलण्यासाठी दानवे अंगावर धावून गेले, आई-बहिणींवरून शिवीगाळ केली. आता प्रश्न हा उपस्थित होतो की, विधिमंडळाच्या इतिहासात या सभागृहाचे सदस्य हातवारे आणि अंगुलिनिर्देश करूनच बोलतात. शिवाय ते एकमेकांकडे बघूनच बोलतात. खरं तर डायसकडे पाहून बोललं पाहिजे, असाच नियम आहे. मात्र, डायसवरील व्यक्ती ही माझ्याकडे पाहून बोला, असे वादावादी झाल्यावर नेहमी सातत्याने गेली कित्येक वर्षोन्वर्षे सांगताना ऐकले आहे. याचाच अर्थ काय तर एकमेकांकडेच पाहून सभागृहात बोललं जातं, हातवारे केले जातात, वेळप्रसंगी चिमटे काढले जातात, एकमेकांची खेचतात असाच सभागृहाचा प्रघात आहे.
 
 
Opposition leader Ambadas Danve मग नेमकं दानवेंना केवळ अंगुलिनिर्देश केल्याचा एवढा राग यावा? त्यावरून त्यांनी अंगावर धावून जावे? सभागृहाच्या, महिलांच्या विषयीचा सर्व मानसन्मान पायदळी तुडवत भर सभागृहात महिला सदस्य उपस्थित असताना आई-बहिणीवरून शिवीगाळ करावी? एवढंच नव्हे, तर बाहेर जाऊन, माजोरड्या पद्धतीने अशीच भाषा वापरेल, बोटं तोडून टाकू, अशा शब्दात गुंडगिरीची भाषा वापरली. राज्य विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच संवैधानिक पद असलेला विरोधी पक्षनेता अशा अश्लील शब्दाच्या, असभ्य व बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवून निलंबित झाला असेल. खरं तर, सभागृहाची गरिमा राखणे आणि महिलांविषयी आदर, सहकारी सदस्यांचा सन्मान आणि विधिमंडळाच्या आचारसंहितेची जाण नसणे आणि जाण असेल तरी जाणीवपूर्वक असा प्रकार करणे अशा दोन्ही परिस्थितीत या व्यक्तीला अशा संवैधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. पण यात दानवेंचं काही चुकलं, असंही म्हणू शकत नाही. कारण, यांची शिकवण, यांची मानसिकता, यांची संस्कृती आणि संस्कार असेच आहेत. सभागृहाचा कधीही आदर ठाकरे गटाकडून केला गेला नाही. महिलांविषयीची यांची विचारसरणी तर अत्यंत खालच्या पातळीची आहे. हेही वाचा : हाच का आमचा संस्कार?
 
 
Opposition leader Ambadas Danve जरा आठवा संजय राऊत याने कंगना राणावत, नवनीत राणांसारख्या दिग्गज महिलांविषयी कसे भाष्य केले होते आणि डॉ. स्वप्ना पाटकरांना कशा शब्दात बोलला, हेदेखील अवघ्या महाराष्ट्राने ऐकले आहे. महिला तर महिला, पुरुषांबद्दलचेदेखील राऊतांचे वक्तव्य बघितले, तरी सार्वजनिक जीवनात किंवा महत्त्वाची पदं किंवा राजकीय प्रभावी पदांवर राहण्याची यांची अजिबात लायकी नाही, असेच वारंवार सिद्ध करून दाखवले आहे. ते समाजमाध्यमांवर ट्रोल करताना किंवा खिल्ली उडवताना लोकं राऊतांचे तोंड म्हणजे गटार असल्याच्या ज्या पोस्ट टाकतात ना! त्यावर राऊत आपल्या कृतीतून पुन्हा पुन्हा शिक्कामोर्तब करतात. अशा गटाराच्या संगतीत राहणार्‍या किंबहूना गटारांच्याच संघटनेच्या या दानवे नावाच्या व्यक्तीकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा तरी कशी केली जावी? कारण संघटनेच्या प्रमुखाने सभागृहात केलेल्या शिवीगाळीनंतर, महिलांच्या अपमानानंतरदेखील त्याची पाठराखण केली. विषय कोणताही असू देत. तो लोकसभेतला किंवा विधानसभेतला. मात्र, एखाद्या सदस्याला सभागृहात आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तो त्याने मांडू नये, असा आग्रह यांनी का म्हणून करावा? त्याला विरोध करायचा असेल तर त्यासाठी मर्यादेत राहून, उचित आयुधांचा वापर करून सभ्य भाषेत तो करता आला असता. पण मुळातच यांची भाईगिरी, टपोरीगिरीची संस्कृती आणि तसलेच यांचे संस्कार. आता ज्यांचा प्रमुखच असल्या कृती, भाषेचं समर्थन करतो, त्यांच्या नेतृत्वातील अन्य नेते, कार्यकर्त्यांकडून अपेक्षा तरी कशी करायची? 
 
- 9270333886