गडचिरोलीत माओवाद्यांनी केला IED स्फोटाचा प्रयत्न

    दिनांक :06-Jul-2024
Total Views |
maoies
 
गडचिरोली,
Maoists in Gadchiroli शोध मोहिमेवरून परतणाऱ्या जवानांवर माओवाद्यांकडून आयईडी  स्फोटाचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने यात दोन जवान किरकोळ जखमी झाले. माहितीनुसार, धोडराज परिसरात सकाळी आठच्या सुमारास अभियानावरून परत येत असलेल्या सी-60 जवानांवर माओवाद्यांनी आयईडी स्फोटाचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. सी-60 चे जवान रस्त्यावर शोध अभियान करत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ माओवाद्यांनी लोखंडी क्लेमोरने स्फोट केला. यामध्ये दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत. जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात असून परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे. हेही वाचा : अमरनाथ यात्रा स्थगित...वेळेआधी वितळणार शिवलिंग!