बीसीसीआईच्या 125 कोटी रुपयांचा असा होणार वाटप

    दिनांक :08-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली,   
T20 World Cup prize money टीम इंडियाने टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर, बीसीसीआईने 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. बीसीसीआयने त्यावेळी स्पष्ट केले होते की, ही बक्षीस रक्कम सपोर्ट स्टाफ आणि निवडकर्त्यांसह खेळाडूंमध्ये वाटली जाईल. मात्र, ही बक्षीस रक्कम कशी वाटली जाईल, याचा अंदाज चाहत्यांना बसत नव्हता. त्यामुळे आता याबाबतची माहितीही समोर येत आहे. वृत्तानुसार, प्रशिक्षक राहुल द्रविडसह टी20 विश्वचषक संघात समाविष्ट असलेल्या 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील. रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान आणि शुभमन गिल या राखीव खेळाडूंनाही पैसे मिळतील. हेही वाचा : अवघ्या काही तासात का बुडते मुंबई ...ही आहेत कारणे
 
T20 World Cup prize money
 
हेही वाचा: ख्रिस गेलने केला कहर, दाखवले तरुणाईचे उग्र रूप, VIDEO अहवालात असे सांगण्यात आले आहे की, खेळाडूंव्यतिरिक्त, संघाच्या कोअर कोचिंग स्टाफमध्ये प्रत्येकी 2.5 कोटी रुपये वितरित केले जातील, ज्यात फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या संघाची निवड करणाऱ्या अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये समाविष्ट असलेल्या 5 निवडकर्त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या बक्षीस रकमेत बॅकरूमच्या उर्वरित कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. T20 World Cup prize money तीन फिजिओथेरपिस्ट, तीन थ्रोडाउन विशेषज्ञ, दोन मालिश करणारे, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक यांना प्रत्येकी 2 कोटी रुपये मिळतील. टीम इंडियाच्या खेळाडूंसह एकूण 42 जण टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेले होते. संघाचे व्हिडिओ विश्लेषक, संघासोबत प्रवास करणारे बीसीसीआयचे कर्मचारी, मीडिया अधिकारी आणि संघाचे लॉजिस्टिक मॅनेजर यांनाही हे बक्षीस दिले जाणार असल्याचे सांगितल्या जात आहेत.