पॅरिस,
Swapnil Kusale role mode is Dhoni पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या स्वप्निल कुसळेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्याने कांस्यपदक पटकावलं आहे. हे ऑलम्पिकमधील भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. या आधी भारताने नेमबाजीमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. विशेष म्हणजे भारताला पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये तीन मेडल मिळाले आहेत. स्वप्निलचा आदर्श हा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आहे. धोनीच्या शांत आणि संयमी राहण्याच्या स्वभावाचा आपल्यावर फार मोठा प्रभाव असल्याचं स्वप्निलनेच सांगितलं आहे. पात्रता फेरीमध्ये टॉप 8 मध्ये राहून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर स्वप्निलनेच हा खुलासा केला. "मी रेंजवर असता मला फार गप्पा मारायला आवडत नाही. शांत आणि संयमी राहण्यास माझं प्राधान्य असतं. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी मला या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.
हेही वाचा : मुंबई-चेन्नईची 10 टक्के जमीन समुद्र गिळणार...
मी धोनीचा फार मोठा चाहता आहे. मैदानामध्ये कितीही तणाव असला तरी तो शांत अन् संयमी असतो. मला हे फार भावते. मलाही अशाच पद्धतीने वावरायला आवडत असल्याचे तो म्हणाला. विशेष म्हणजे धोनी आधी ज्याप्रमाणे तिकीट तपासणीस म्हणजेच टीसी म्हणून काम करायचा त्याप्रमाणे स्वप्निलही टीसीच आहे. Swapnil Kusale role mode is Dhoni कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता. स्वप्निलने 451.4 पॉइण्ट्स पटकावत कांस्य पदकावर नाव कोरलं. विशेष म्हणजे पात्रता फेरीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या चीनच्या लियूनेच सुवर्णपदक पटकावलं. लियूने एकूण 463.9 पॉइण्ट्स मिळवले. तर युक्रेनचा सेरहिय कुशिकने 461.3 पॉइण्ट्स मिळवत दुसरं स्थान पटकावलं. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये स्वप्निल सहाव्या स्थानी होता. त्याने मजल दरमजल करत पाचव्या, चौथ्या स्थानी झेप घेत अखेरच्या फेरीमध्ये तिसरे स्थान निश्चित केलं.
हेही वाचा : अश्या गुंडाला मुख्यमंत्री आवासात कोण ठेवते ...सुप्रीम कोर्ट कडाडले !