अजितदादांच्या जीवाला धोका...गुप्तचर यंत्रणेने दिला हाय अलर्ट !

Ajit Pawar-attack-high alert दहशतवादी संघटना सक्रीय

    दिनांक :11-Aug-2024
Total Views |
मुंबई,
 
Ajit Pawar-attack-high alert आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेतून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. नाशिकमधून सुरू झालेली ही यात्रा सध्या मालेगावात पोचली आहे. आतापर्यंत निर्धोक सुरू असलेल्या या यात्रेच्या पुढच्या टप्प्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं वृत्त आहे. Ajit Pawar-attack-high alert विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका असून, त्यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला होऊ शकतो, असा अलर्ट गुप्तचर यंत्रणेने जारी केला आहे.
 

Ajit Pawar-attack-high alert 
 
 
जनसन्मान यात्रेत अजित पवार मालेगाव आणि धुळ्यात दौरा करणार आहेत. Ajit Pawar-attack-high alert अजित पवारांच्या या दौऱ्यात त्यांना धोका असून, मालेगाव दौऱ्याच्यावेळी विशेष काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिली आहे. जळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे ही माहिती दिली. राज्याचा संवेदनशील भाग असल्याची नवी ओळख गेल्या काही वर्षात मालेगावला मिळाली आहे. Ajit Pawar-attack-high alert किरकोळ कारणांवरून दंगली आणि हिंसाचार याआधीही मालेगावमध्ये झाला आहे. हेही वाचा : हसीना म्हणाल्या, "समर्पण केले असते तर ..."
 
 
दरम्यान, जनसन्मान यात्रेचा ‘गुलाबी' रंग जनसामान्यांचे लक्ष वेधत असून त्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात येत आहे. अजितदादांच्या जॅकेटसह त्यांच्या वाहनांवर आणि सभेच्या मांडवांमध्येही गुलाबी रंगाचा प्रभाव दिसतो आहे. Ajit Pawar-attack-high alert या माध्यमातून, महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आणि इतर शासकीय योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. पवारांच्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचीही चर्चा आहे.
 
 
यात्रेचे यश-अपयश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढे येणार असले तरी, आत्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येण्याचीही शक्यता आहे. Ajit Pawar-attack-high alert गुप्तचर यंत्रणेने जारी केलेल्या अलर्टनंतर, दादांचे सुरक्षा अधिकारी सतर्क झाले आहेत. दहशतवादी हल्ल्याचे गालबोट जनसन्मान यात्रेला लागू नये, अशीच सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे.