साप्ताहिक राशिभविष्य
मेष (Aries) : भांडणे विकोपाला जाऊ नयेत
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या सप्तम स्थानामधून सुरू होत आहे. राशिस्वामी मंगळासोबत त्याचे षडाष्टक आहे. या योगाच्या प्रभावामुळे या राशीच्या मंडळींना हा आठवडा साधारण स्वरूपाचा व काहीसा कष्टप्रद राहील असे दिसते. मनात योजलेली कामे काहीशा विलंबानेच पूर्णत्वाकडे जाऊ शकतील. त्यातही आपणास बरेच प्रयत्न करावे लागू शकतात. त्यामुळे महत्त्वाच्या कामांची सुरुवात तूर्त लांबणीवर टाकण्यास हरकत नाही. कुटुंबातील भांडणे विकोपाला जाणार याची काळजी घ्यायला हवी. वडिलोपार्जित मालमत्तेवरून काही मतभेद राहू शकतात.
हेही वाचा: 'यह बांग्लादेश नहीं, नरेंद्र मोदी का भारत है'...असा का म्हणाले केंद्रिय मंत्री गजेंद्र शेखावत? शुभ दिनांक - १३, १४, १६, १७.
वृषभ (Taurus) : समाधानकारक आर्थिक उलाढाली
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील सहाव्या स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी शुक्र सुख स्थानात शुभ आहे. या राशीच्या मंडळींना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा जावा. या जे लोक सरकारी नोकरीत असतील त्यांना मात्र या आठवड्याचा पूर्वार्ध निश्चितच सुखावह व नवीन संधी देणारा राहील. जमीन-जुमल्याची कामे, स्थावर मिळकतीची प्रकरणे प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. वारसा वा संपत्तीच्या प्रकरणावरून सुरू असलेले आपसातील वादविवाद वाढणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यावसायिक करार-मदार, आर्थिक उलाढाली समाधानकारक राहतील. व्यवसाय विस्ताराच्या योजना राबविता
शुभ दिनांक - १४, १५, १६, १७.
मिथुन (Gemini) : भाग्यवर्धक योग लाभावे
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पंचम या अतिशय शुभ स्थानातून सुरू होत आहे तर राशिस्वामी बुध पराक्रम स्थानात आहे. हा अतिशय उत्तम योग असून काही मंडळींसाठी भाग्यवर्धक आठवडा ठरू शकेल. आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह लाभकारक ठरावा. निसर्ग नटलेला आपले मन प्रफुल्लित झालेले असणार. कुटुंबात काही मंगलकार्ये, घर-वास्तुनिर्माणाच्या योजना, खरेदी संबंधातील आडाखे बांधायला सुरुवात झालेली असेल. आपल्या योजनांना फळ मिळाल्यावाचून राहणार नाही. कुटुंबातून मार्गदर्शन व आर्थिक, मानसिक सहाय्य मिळेल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात प्रयत्नांची कमी पडू नये. प्रवासाचे योग यावेत.
हेही वाचा: ...अदानीनंतर आता सेबी आहे रडारवर ! शुभ दिनांक - ११, १२, १५, १७.
कर्क (Cancer) : मेहनतीचेे चीज
या आठवड्यात आपला राशिस्वामी चंद्राचे भ्रमण कुंडलीतील सुख स्थानातून सुरू होत आहे. चंद्राचे हे भ्रमण व अन्यही ग्रहयोग आपल्याला आर्थिकदृष्ट्या लाभकारक ठरावे. आपण आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक, नवीन जबाबदारी मिळणे, काही मंडळींना पदोन्नती, पगारवाढ, इन्सेंटिव्ह मिळणे वगैरे स्वरूपात लाभ पदरी पडण्याची शक्यता आहे. नोकरदारांना मर्जी संपादन करता येईल. कार्यक्षेत्रात सहकार्यांची साथ लाभणार आहे. घरात काही शुभकार्ये ठरण्याची शक्यता असल्यामुळे आनंदात भरच पडेल. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.
शुभ दिनांक - ११, १२, १३, १७.
सिंह (Leo) : कामाची गती मंदावेल
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या पराक्रम स्थानातून सुरू होत आहे तर राशिस्वामी रवी व्यय स्थानात आहे. या आठवड्याच्या अखेरीस आपल्या राशीत येणार आहे. हे पाहता हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा ठरावा. या सप्ताहात खर्च काहीसा अधिक होऊ शकतो, त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करावा. आजूबाजूच्या घटना वेगात घडत असतानाच आपल्या कामांना मात्र विलंब लागतोय, आपली कामे अतिशय सावकाशपणे होत आहेत असा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे योग्य करून कामांच्या पूर्णत्वासाठी जोरकसपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.
शुभ दिनांक - १२, १३, १६, १७.
कन्या (Virgo) : खंबीरपणे प्रयत्न करावेत
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील धन स्थानातून सुरू होत असून राशिस्वामी बुध व्यय स्थानात अस्तंगत आहे. त्याच्यासोबत खर्चिक वृत्तीचा शुक्रदेखील आहे. हे ग्रहमान पाहता या आठवड्यात आवकपेक्षा जावक अधिक शक्यता आहे. या सप्ताहात आपली कामे पूर्णत्वास न्यायची असतील तर अधिक खंबीरपणे प्रयत्न करावयास पाहिजेत. अवसान गाळून बसल्याने कामे व्हायची नाहीत. आपल्या वागण्यातील बेपर्वाई, बेफिकिरी बरोबर नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. नातेवाईकांच्या सहवासात, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये काही नाट्यमय प्रसंग घडू शकतात.
शुभ दिनांक - १४, १५, १६, १७.
तूळ (Libra) : उमेद राहणार
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्याच राशीतून सुरू होत असून आपला राशिस्वामी शुक्र लाभस्थानात बसला आहे. हा शुक्र आठवडाअखेरीस अधिक बलवान स्थितीत येणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहीसे खर्चवर्धक योग येण्याची शक्यता आहे. या सप्ताहात कोणतेही मोठे नुकसान होण्याची भीती नसल्याची खात्री देता येत असली तरी विषाची परीक्षा नको म्हणून कामात कोणावरही विश्वास टाकताना पुरेपूर खातरजमा करून घेणे फायद्याचे ठरेल. एरवी आपली उमेद टिकवून कामे पूर्णत्वास नेता येणार. काही विशेष घडविण्यासाठी आपणास सप्ताहाअखेर ग्रहमान प्रेरित करू शकतात व त्यातून यश, कौतुक, प्रसिद्धी लाभेल.
शुभ दिनांक - ११, १२, १६, १७.
वृश्चिक (Scorpio) : तोंडावर लगाम आवश्यक
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या व्यय स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी मंगळ सप्तम स्थानात शुभंकर गुरूसोबत आहे. अन्य ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास बर्याच बाबतीत संयम राखण्यास सुचवीत आहे. विशेषतः तोंडावर लगाम घालायला विसरू नये. या व्यतिरिक्त सप्ताहाच्या उत्तरार्धात काही नावीन्यपूर्ण घडामोडी अचंबित करतील. आपल्या काही निर्णयामुळे कुटुंबात संमिश्र प्रतिक्रिया उमटू शकतील. मोठी खरेदी, अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. तरुणांना उत्तम संधी लाभू शकतात. काहींना नोकरीच्या निमित्ताने परदेश गमनाची संधी यावी. त्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना वेग मिळेल.
शुभ दिनांक - १३, १४, १५, १६.
धनु (Sagittarius) : योजना साकार होतील
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील लाभ स्थानातून सुरू होत आहे तर राशिस्वामी सहाव्या स्थानात मंगळासोबत असल्याने या सप्ताहात काही अचानक घटनाक्रम आपल्याला अनुभवावे लागू शकतात. आपल्या कार्यालयात, व्यवसायादी कार्यक्षेत्रात आपली बाजू वरचढ राहील. तथापि, आपल्या कामाची दिशा, झपाटा बदलू न देता आगेकूच करण्यातच आपले हित आहे, हे लक्षात ठेवा. अशी वाटचाल असली तर त्याचे दूरगामी लाभ मिळतील, हे निश्चित. जमीन, वाहन, अशा मोठ्या खरेदीच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहू शकाल. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम जावा. योजनांना मूर्त रूप लाभू शकेल.
शुभ दिनांक - १२, १४, १६, १७.
मकर (Capricorn) : जबाबदारीचा ताण वाढेल
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील दशम या कर्म स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी शनी धनस्थानात बसला सप्ताहाची सुरुवात आपणास साधारण वाटणार असली, तरी सप्ताहाचा शेवट मात्र अतिशय उत्तम व आनंददायी असू शकेल, असे म्हणता येईल. आळस व मवाळ धोरणामुळे काही संधी हातातून जाण्याची भीती या सप्ताहारंभी निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील तसेच व्यवसायातील जबाबदारीचा ताण काहीसा वाढू शकतो. सहकार्यांची मने राखावी लागतील. घरातील कामासाठी, एखाद्या कार्यक्रमासाठी मोठा खर्च होऊ शकतो.
शुभ दिनांक - १२, १४, १६, १७.
कुंभ (Aquarius) : आनंदवर्धक घडामोडी घडतील
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील भाग्यदर्शक नवम स्थानातून सुरू होत असून आपला राशिस्वामी शनी राशिस्थानातच आहे. ही अतिशय उत्तम व भाग्यवर्धक स्थिती आहे. घरातून, कुटुंबातून काही चांगल्या वार्ता कळतील. युवा वर्गाला नोकरी-व्यवसायात संधी मिळू शकतील. या सप्ताहात काही अपेक्षित घटनाक्रम घडावयास लागतील. नोकरीत असणार्यांना चांगल्या संधी लाभतील. काहींना नोकरीत बदल, स्थानांतर करता येऊ शकेल. वारशाचे किंवा कौटुंबिक स्वरूपाचे प्रश्न सुटू शकतील. विवाहेच्छू युवक-युवतींना अनुरूप स्थळे लाभावीत.
शुभ दिनांक - १२, १३, १६, १७.
मीन (Pisces) : प्रतीक्षा, विलंब, आरोग्याची काळजी
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे आपल्या कुंडलीतील आठव्या या पीडादायक स्थानामधून सुरू होत आहे. अशात राशिस्वामी गुरू कुंडलीच्या पराक्रम स्थानात मंगळासोबत आहे. अचानक निर्माण होणार्या काही मोठ्या खर्चाचे संकेत या सप्ताहात आपणास मिळू शकतात. तरुण वर्गाला नोकरी- व्यवसायासाठीच्या संधी, कामकरी वर्गाला अपेक्षित पगारवाढ, पदोन्नतीचे योग लाभण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता दर्शवीत आहेत. गुंतवणूक सध्या करू नये. आर्थिक व्यवहार करताना पुरेशी सावधगिरी बाळगा. कोणावरही एकाएकी विश्वास टाकून गाफील राहू नये.
शुभ दिनांक - १२, १४, १५, १६.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६