संतापजनक...छत्रपतींचा पुतळा कोसळला !

Shivaji Maharaj-statue-collapsed मालवणमधील घटना

    दिनांक :26-Aug-2024
Total Views |
सिंधुदुर्ग, 
 
Shivaji Maharaj-statue-collapsed हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात.  गेल्या वर्षी ४  डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त (Indian Navy) मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला  छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पूर्णाकृती पुतळा दुर्दैवानं कोसळला. Shivaji Maharaj-statue-collapsed यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळल्याचा आरोप करण्यात येत आहे. एक वर्षही पूर्ण होण्यापूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला हा पुतळा कोसळल्याने नागरिकांमध्ये विशेषतः शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आली आहे.
 
 

Shivaji Maharaj-statue-collapsed 
 
 
Shivaji Maharaj-statue-collapsed विशेष म्हणजे ज्या किल्ल्यावर हा पुतळा उभारला होता तो किल्ला ४०० वर्षे जुना असून त्यातील एक दगडही ढासळलेला नाही. किल्ले राजकोट परिसराचं सुशोभीकरण तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे ४३  फूट एवढी आहे. Shivaji Maharaj-statue-collapsed राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ३५  फुटांचा होता. बांधकाम जमिनीपासून १५ फूट तर त्यावर २८  फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असं हे स्ट्रक्चर होतं. हा पुतळा नौसनेकडून उभारण्यात आला. भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. पुतळ्याची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये होती. Shivaji Maharaj-statue-collapsed कल्याणचे युवा शिल्पकार आणि मूळ मालवणचे जयदीप आपटे यांनी हे शिल्प बनवले होते.