हिट अ‍ॅण्ड रन नव्हे टॉक अ‍ॅण्ड रन!

    दिनांक :14-Sep-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या कारने एका मध्यरात्री काही दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. आणि या घटनेवरून संकेत बावनकुळेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, बावकुळे यांच्यावर लक्ष्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. यावेळी, आपल्या वादात घरच्यांना ओढू नये... असे दाखले देणारे ठाकरे गटाचे नेते संकेतचे वडील नेते असल्याने, भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला जाणीवपूर्वक अडकविण्यासाठी जंगजंग पछाडत असल्याचे दिसत आहेत. त्यासाठी एका कपोलकल्पित बिलाची पटकथादेखील रचली गेली. या पटकथेचं शीर्षक ‘बीफ कटलेट’ ठेवण्यात आलं. आणि या एकपात्री प्रयोग घरगडी राऊत माध्यमांसमोर येऊन करू लागल्याचे दिसले. हेही वाचा : भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे!
 
 
Sanjay Raut
 
घरगड्याने रचलेल्या पटकथेतून, त्यांच्या कपोलकल्पित कथेतील बिलावर दारू, चिकन, मटणासह ‘बीफ कटलेट’चाही समावेश असल्याचे सांगितले. हे सांगत त्यांनी हिंदुत्व शिकवणारे लोकं आता ‘बीफ कटलेट’ खाऊन, आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा सवाल करत भाजपावर आसूड उगारण्याचा प्रयत्न केला. विषयाला भटकविण्याची, खोटं खोटी माहिती पसरविण्याची घरगड्याची तशी जुनीच खोड आहे. ते ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा मुद्दा चघळता चघळता कधी ‘टॉक अ‍ॅण्ड रन’ करतील याचा काही नेम नाही. घरगडी ‘टॉक अ‍ॅण्ड रन’चे मास्टर आहेत. त्यांनी याविषयात डॉक्टरेट केली आहे. खोटं बोलणं आणि पळ काढणं हा त्यांचा एकप्रकारे धंदा झाला आहे. मी मजबूत पुराव्यांशिवाय नाही. म्हणून, मला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याबाबतची घरगड्याने पोलिस आयुक्तांना लेखी तक्रार केली. त्यानंतर प्रसार माध्यमांसमोर येऊन कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा थयथयाट केला. जेव्हा पोलिसांनी राऊतांच्या पत्रावर चौकशी सुरू केली तेव्हा Sanjay Raut राऊतांनी त्यांच्या वृत्तपत्रात काम करत असलेल्या कनिष्ठ सहकार्‍याचं नाव सांगितलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्या सहकार्‍याने आपण सांगितले नसल्याचे म्हटले होते. अर्थात हे प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण याठिकाणी देत आहोत. असे घुमजाव करत ‘टॉक अ‍ॅण्ड रन’ केल्याची राऊतांची भरमसाठ उदाहरणे आहेत. नावाने कार असणं आणि तो भाजपा प्रदेशाध्यक्षाचा मुलगा असणं एवढीच काय चुकी त्या संकेत बावनकुळे नावाच्या मुलाची. कार कोण चालवत होता, हे प्रत्यक्षदर्शींनी बघितलं. खरंतर आजच्या मीडियाच्या काळात आता घटना आणि सत्य, लपवणं आणि लपणं कठीण आहे. दिशा सालियनसारख्या प्रकरणांचा अपवाद वगळला तर. याठिकाणीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले असल्याने, सत्य समोर आणण्यात थोडा वेळ लागत आहे.
 
 
याचाच वचपा काढण्यासाठी आहे की काय माहिती नाही पण आमच्या मुलाला अडकवता काय? मग आम्ही तुमचा मुलगा अडकवू, भावना देखील आरोपकर्त्यांची असू शकते, बरं का...! या सूड भावनेतून बावनकुळेंचा मुलगा अपघात प्रकरणात अडकताना दिसत नाही तर, मग ‘बीफ कटलेट’ खाल्याच्या आरोपात अडकवा, म्हणजे केवळ बावनकुळेच नव्हे तर, भाजपा आणि जे कोणत्याही प्रकरणात सहज अडकत नाहीत त्या फडणवीसांनाही घेरता येईल. त्यासाठी मग ‘बीफ कटलेट’सारखा धडधडीत खोटा आरोप केला. तपास काय व्हायचा तो होऊ दे. मात्र, त्याआधीच आरोप खोटा असल्याचा छातीठोक दावा आहे. कारण, बाकी पहिल्या तीन वस्तूंविषयी वाद नाही. त्या सर्वत्र सहज उपलब्ध होऊ शकतात, हे आपण समजू शकतो. मात्र, ‘बीफ कटलेट’ याविषयी प्रश्नचिन्ह आहे. विषय संकेत बावनकुळेचा असो नाहीतर आदित्य ठाकरेेंचा असो. महाराष्ट्रात एखादे रेस्टॉरंट, ज्याचा हिंदू आहे. तो ‘बीफ कटलेट’ राजरोसपणे विक्री करणं, ही बाब शक्य नाही. त्याचं दुसरंही कारण महाराष्ट्रात गोहत्या बंदी लागू आहे. हे हॉटेल मालकाला निश्चित माहीत असणार. त्या व्यतिरिक्तदेखील एखाद्या हॉटेल व्यावसायिकाने चोरून लपून विकलं तर त्याचं उघडपणे बिल देईल इतका मूर्ख एखादा हॉटेल व्यावसायिक असेल, हे विश्वास बसण्यासारखे नाही. विकणार्‍या हॉटेल व्यावसायिकाकडे ‘बीफ कटलेट’चे बिल न देण्याइतका किमान व्यावहारिक शहाणपणा तर असणारच. सगळेच Sanjay Raut संजय राऊत असतात अशातला भाग नाही.
 
 
त्या हॉटेलचा मालक संजय राऊत कॅटेगरीतला नाही. तो जीव तोडून सांगतोय, बीफ विकण्याची कल्पनादेखील मला सहन होत नाही. शिवाय त्याने संजय राऊतांवर मानहानीचा खटलादेखील दाखल केला. आता गाडीत बिल त्यात ‘बीफ कटलेट’चा उल्लेख आहे. या सार्‍या गोष्टी Sanjay Raut संजय राऊतला मुंबईत बसून कशा कळल्या असाव्यात? हा खरा प्रश्न आहे. मुळात मालकासारखं घरी बसून दरबारी राजकारण करण्याची सवय असलेल्यांना ऐकीव माहितीच्या आधारावर ‘खोटं बोला पण रेटून बोला’ची सवय आहे. त्यामुळे तुक्का लागला तर लागला नाहीतर आता, हॉटेल मालकाकडून दाखल झालेल्या पार्श्वभागाला पाय लावून ‘टॉक अ‍ॅण्ड रन’ राऊत करेल यात शंका नाही. संकेत बावनकुळेचे ‘बीफ कटलेट’ हे केवळ निमित्त मात्र आहे. यामागे दोन गोष्टी आहेत. यात पहिला उद्देश भाजपाविषयीचा द्वेष, असुया आणि अनामिक राग आहेच. शिवाय दुसरी बाब म्हणजे, राहुल गांधींनी केलेल्या आरक्षण हटविण्याच्या वक्तव्यावरून अनुसूचित जाती, जमातीच्या जनतेचं लक्ष प्रयत्न यातून असला पाहिजे. कारण, विधानसभेची निवडणूक येऊ घातली असून, यात आरक्षण विरोधाचा फटका आपल्याला बसू नये हा हेतू असण्याची शक्यता आहे. तसे फार बुद्धिवादी विचारांची अपेक्षा बिनडोकांकडून करणे संयुक्तिक नाही. तरीदेखील काही गोष्टी नकळत कुणाच्या तरी सांगण्यावरून बिनडोक लोकंच करू शकतात, हे मात्र नक्की.
 
 
शार्ट टर्म मेमरी लॉस
मालक उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना काही अज्ञात कारणासाठी भेटायला गेले होते. त्यांच्या भेटी मागचे रहस्य आजही गुलदस्त्यात आहे. ते अद्याप उघड झाले नाही. त्या भेटीमागचे कारण ना कधी मालकांनी सांगितले, नाही कधी घरगड्याने सांगितले. ना कधी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सांगितले. या भेटीचा विसर पडलेल्या ‘शार्ट टर्म मेमरी लॉस’ घरगडी आणि लाचार सेना आता जाहीरपणे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे श्रीगणेशाच्या दर्शनासाठी गेलेल्या देशाच्या पंतप्रधानांच्या जाण्यावर अकांडतांडव करताना दिसत आहेत. 
 
- ९२७०३३३८८६