भयावह! ओडिशात रस्ते अपघातात सहा ठार, 11 जखमी

पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला

    दिनांक :15-Sep-2024
Total Views |
बोलंगीर,
Odisha Accident : ओडिशात तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. बोलंगीर जिल्ह्यातील मध्यपाली जवळ राष्ट्रीय महामार्ग 26 वर मोटारसायकलची दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला.

acc
 
दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत स्थानिक लोकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. दोघांनाही बोलंगीर भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हेही वाचा : टीम इंडियातून शुबमन गिलचा पत्ता कट होणार?
मयूरभंज जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात तीन जण ठार तर 11 जखमी झाले. बारीपाडा शहराच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग-18 वर मोटारसायकल आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 25 वर्षीय विकास मोहंता आणि 26 वर्षीय मिटू मोहंता अशी मृतांची नावे आहेत. हेही वाचा : हृदयद्रावक! बांगलादेशातून महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा video व्हायरल
अन्य एका अपघातात बारीपाडा-लुलुंग रस्त्यावरील खासदिहाजवळ 13 जणांना घेऊन जाणारी भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या घटनेत कार चालकासह अन्य एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. भुबन सिंग आणि जयंत सिंग अशी मृतांची नावे आहेत. जखमींना पीआरएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिल्हापेठ पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.