चीनमध्ये 75 वर्षांनंतरची सर्वात मोठी आपत्ती, शांघाय शहर ठप्प

    दिनांक :16-Sep-2024
Total Views |
बीजिंग, 
disaster in China 'बेबिंका' वादळ सोमवारी चीनच्या शांघाय शहराला धडकले, जे गेल्या 75 वर्षांतील शहराला धडकणारे सर्वात शक्तिशाली वादळ आहे. या वादळामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. शांघायच्या केंद्रीय हवामान वेधशाळेने सांगितले की, वादळ 42 मीटर प्रति सेकंद वेगाने वाऱ्यासह शांघायच्या 'पुडोंग डिस्ट्रिक्ट'च्या लिंगांग भागात पोहोचले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी शहर प्रशासनाने आधीच हजारो मदत आणि बचाव कर्मचारी तैनात केले आहेत. बेबिंका हा 75 वर्षांतील शांघायला धडकणारा सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ मानला जातो. चीनमध्ये या वर्षात आलेले हे 13 वे वादळ आहे.

disaster in China 
 
एका वृत्तसंस्थानुसार 'शिन्हुआ' ने वृत्त दिले आहे की राज्य पूर नियंत्रण आणि दुष्काळ निवारण मुख्यालयाने रविवारी चीनच्या पूर्व अनहुई प्रांत आणि शांघाय आणि झेजियांगसाठी मदत उपायांमध्ये वाढ केली आहे. बाबिंकामुळे शांघायमधील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. disaster in China शांघाय रेल्वे स्थानकाने रविवार ते सोमवार या कालावधीत शहरातून जाणाऱ्या अनेक मार्गांवर प्रवासी गाड्या निलंबित करण्याची घोषणा केली आहे. 
चीन सरकारनेही वादळाचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. शांघायमध्ये हजारो मदत आणि बचाव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि अनेक ठिकाणी मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत, जेथे आपत्कालीन परिस्थितीत लोक आश्रय घेऊ शकतात. चीनमध्ये सध्या सणासुदीच्या सुट्ट्या सुरू आहेत. disaster in China अशा परिस्थितीत सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. वादळामुळे शांघायमधील अनेक रिसॉर्ट्स, मनोरंजन पार्क आणि पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. विमानतळांवर मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.