विनेश फोगटने सोडली सरकारी नोकरी!

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Vinesh Phogat left job भारताची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगटने एक मोठा निर्णय घेत तिची सरकारी नोकरी सोडली आहे. शुक्रवारी विनेश फोगट यांनी सरकारी नोकरी सोडण्याची घोषणा केली. त्यांनी आपला राजीनामा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विनेश फोगट ही उत्तर रेल्वेत नोकरी करायची. ती विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून तैनात होती. रेल्वेची नोकरी सोडताना विनेश फोगटने लिहिले की, 'भारतीय रेल्वेची सेवा हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानास्पद काळ आहे, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझे राजीनामा पत्र त्यांना सादर केले आहे भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. देशसेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन. हेही वाचा : आणि 'तिच्या' पायात स्केटिंग राहिल्या...मनाला हादरविणारे फोटो!

ndshyd 
 
रेल्वेची नोकरी का सोडत आहे, हे विनेश फोगटने राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे. विनेशने लिहिले की, तिच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे ती नोकरी सोडत आहे. विनेश फोगट या रेल्वेत ओएसडी होत्या आणि या पदाला चांगला पगार मिळतो. रिपोर्ट्सनुसार, रेल्वे ओएसडीला वर्षाला 15 ते 17 लाख रुपये मिळतात. Vinesh Phogat left job विनेश फोगटनेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, ती हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवू शकते. विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. तिने 50 किलो कुस्ती प्रकारात अंतिम फेरी गाठली होती, मात्र 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. यामुळे तिची ऑलिम्पिक पदक जिंकण्याची संधी हुकली. हेही वाचा : लॉस एंजेलिस बनलाय जोशीमठ...नाही दिसणार पुन्हा हे शहर ?