मकर संक्रांति, पोंगल आणि लोहरी; सण एक नाव अनेक

    दिनांक :13-Jan-2025
Total Views |
Makar Sankranti
भारत हा उत्सवप्रधान देश असून सणांचा माहेरघर म्हणून ओळखला जातो. भारतात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने प्रत्येक सण साजरा केला जातो. असाच एक बहुप्रतीक्षित सण म्हणजे मकर संक्रांत. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांत हा एक शुभ दिवस मानला जातो. सण साजरा करण्यामागचे उद्देश जरी एक असले तरी या सणाला विविध नावे आहेत. कुठे मकर संक्रांत, उत्तरायण, तर कुठे पोंगल, लोहरी अशा विविध नावांनी हा सण ओळखला जातो. चला तर जाणून घेऊया मकर संक्रांतबद्दल संपूर्ण माहिती.
 
Makar Sankranti 
 
संपूर्ण भारतात मकर संक्रांत हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. भारतातील विविधतेत एकता आहे हे यावरून सिद्ध होते, कारण सण साजरा करण्याच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी उद्देश आणि महत्व मात्र एक आहे. पूर्व भारतात हा सण माघ बिहू या नावाने ओळखला जातो. पारंपरिक गाणी आणि प्रार्थनांसह हा सण साजरा केला जातो. पिकांच्या कापणीचा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. Makar Sankranti येथील मान्यतेनुसार, मनुष्य आणि निर्सग यांच्यातील सुसंवाद आणि कृतज्ञता अधोरेखित करणे हे या सणाचे उद्देश आहे. यादरम्यान, पृथ्वी म्हणजेच जमिनीची पूजा करून मनुष्य कृतज्ञता व्यक्त करतात. हेही वाचा : गुगल सर्चमध्ये आले आहे एक खास फीचर...महाकुंभ टाइप करताच होतो फुलांचा वर्षाव !
 
पश्चिम भारतातील गुजरातमध्ये हा सण उत्तरायण आणि पतंगोत्सव या नावाने प्रसिद्ध आहे. रंगबिरंगी पतंगे आकाशात उडवून हा सण साजरा केला जातो. पंतग उडविण्याच्या कृतीला इथे सूर्य देवाचा सन्मान असे अध्यात्मिक महत्व आहे. पतंगीप्रमाणे व्यक्तीचे चैतन्य देखील उंच भरारी घेतो असे मानले जाते. Makar Sankranti भूतकाळातील अंधार सोडून भविष्यातील प्रकाशाकडे पुढे पाऊल टाकणे असा संदेश या सणाद्वारे दिला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रातीचा सण हा तिळगुळ शिवाय अपूर्ण आहे. या दिवशी 'तिळगुळ घ्या, गोड गोड बोला' म्हणत तिळगुळाची देवाणघेवाण केली जाते. समाजात सुसंवाद, प्रेम, करुणा आणि क्षमा भाव वाढावा हे यामागचे उद्देश असते. आपापसातील नात्यांमध्ये झालेले रुसवे-फुगवे विसरून एक नवीन आणि गोड सुरुवात करावी असा संदेश दिला जातो. हेही वाचा : महाकुंभातील अमृत स्नानादरम्यान, भाविकांना झोपलेल्या हनुमानजींच्या दर्शनावर बंदी
 
उत्तर भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये, लोक गंगा, यमुना आणि गोदावरी यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये विधीवत स्नान करून सूर्य देवाची पूजा करतात. Makar Sankranti असे मानले जाते की हे स्नान केल्याने पुण्य मिळते आणि पापांचा नाश होतो. भारताच्या उत्तर भागात विशेषतः पंजाबमध्ये मकर संक्रांतिच्या पूर्वसंध्येला लोहरी हा सण साजरा केला जातो. पीक कापणीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दरम्यान, शेकोटी पेटवून त्याभोवती गाणे गात नृत्य करून हा सण साजरा केला जातो.
 
भारताच्या दक्षिण भागात हा सण पोंगल या नावाने प्रसिद्ध आहे. Makar Sankranti तामिळनाडूमध्ये हा सण चार दिवसांपर्यंत साजरा केला जातो. अध्यात्मिक मान्यतेनुसार, हा सण आंतरिक शुद्धीकरण आणि नूतनीकरणाचा प्रतीक मानला जातो. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून पोंगल (गोड भात) तयार करून ते सूर्यदेवाला अर्पित करतात. या सणाला विपुलता, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. एकंदरीत हिवाळा संपून वसंत ऋतूला होणारी सुरुवात आणि पिकांच्या कापणीचे उत्साह साजरा करणारा हा सण आहे.