आता नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या केवळ सहा!

नक्षलवादावर अमित शहांची मोठी घोषणा

    दिनांक :01-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Naxal-affected districts देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या केवळ ६ वर आली आहे. पूर्वी हा आकडा १२ होता, परंतु गेल्या काही महिन्यांत सरकारने नक्षलवादाच्या विरोधात ज्या पद्धतीने मोहीम सुरू केली आहे त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आता देशातील फक्त ६ जिल्हे नक्षलग्रस्त राहिले असल्याचे मोठे विधान गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.  अमित शहा यांनी पुन्हा एकदा ३१ मार्च २०२६ पर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल असा त्यांचा संकल्प पुन्हा व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर वर लिहिले की, मोदी सरकार एक मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध भारत बनवत आहे. आपण विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहोत आणि देश वेगाने नक्षलमुक्त होत असून ३१ मार्च २०२६ पर्यंत भारत पूर्णपणे नक्षलमुक्त होईल.
 

shaha 
 
पुढे शहा म्हणाले की, भारत ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे. नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, आज आपल्या देशाने डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ वरून फक्त सहा पर्यंत Naxal-affected districts कमी करून एक नवीन टप्पा गाठला आहे. या जिल्ह्यांना सर्वाधिक प्रभावित जिल्हे म्हणून उप-वर्गीकृत करण्यात आले आहे. ही २०१५ मध्ये सादर केलेली शब्दावली आहे. याशिवाय, 'चिंतेचे जिल्हे' अशी एक उप-वर्गवारी आहे. ही उपवर्गवारी २०२१ मध्ये तयार करण्यात आली होती. गेल्या आढाव्यानुसार, १२ 'सर्वात जास्त प्रभावित जिल्हे' होते. अधिकृत नोंदीनुसार, २०१५ मध्ये असे ३५ जिल्हे, २०१८ मध्ये ३० जिल्हे आणि २०२१ मध्ये २५ जिल्हे होते. आता हा आकडा वेगाने कमी होत आहे. गेल्या १० वर्षांत २९ जिल्ह्यांमधून नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे आणि आता ते फक्त ६ जिल्ह्यांमध्ये उरले आहे हे स्पष्ट आहे.