तुम्ही देव पाहिलाय का ?

12 Jan 2023 06:50:51
 
नागपूर, 
भारत मातेच्या समृद्ध मानवी इतिहासाचे योद्धा संन्यासी म्हणजे विवेकानंद swami vivekanand कोलकाताच्या एका समृद्ध कुटुंबात जन्मलेल्या नरेंद्रचा कल अध्यात्मतेकडे होता. त्यांचे वडील कलकत्याच्या कोर्टात प्रसिद्ध वकील होते. उच्चशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या कोणत्याही सामान्य मुलाने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी. असे कुणाही पालकांना वाटेल नरेंद्राच्या बाबतीतही त्यांच्या पालकांनी अशी अपेक्षा केलीच असेल. त्याने मात्र संन्यासी बनण्याचा मार्ग स्वीकारला कलकत्या सारख्या प्रगत शहरात, उच्चशिक्षित घरात जन्मलेल्या नरेंद्र ने संन्यास का बरं स्वीकारला असेल ? त्यांचा नरेंद्र ते स्वामी विवेकानंद पर्यंतच्या प्रवासाचा आढावा या लेखातून घेणार आहोत. 
 
gjhg  
 
नरेंद्रचा कल अध्यात्माकडे होता. त्यांची आई भुवनेश्वरी देवी धार्मिक विचारांची स्त्री होती. नरेंद्रच्या वडिलांच्या आणि त्यांच्या आईच्या धार्मिक, पुरोगामी आणि तर्कशुद्ध वृत्तीने त्यांची विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यात मदत केली. नरेंद्रनाथांना swami vivekanand वयाच्या ९ व्या वर्षीच प्रश्न पडला होता, आपला जन्म कशासाठी झाला आहे. त्यांना नेमके काय करायचे आहे. स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच खूप जिज्ञासू होते आणि त्यांना फक्त एकाच प्रश्नात रस होता, तो म्हणजे; तुम्ही कधी देव पाहिला आहे का? हा प्रश्न तो लहानपणापासून भिक्षू, धर्मगुरू, शिक्षक अशा सर्वांना विचारत आला आहे. पण त्याला कधीच उत्तर मिळाले नाही. दारात भिक्षु, संन्यासी आले की, नरेंद्र त्यांना जवळ असेल नसेल ते  टाकायचे म्हणूनच त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी त्यांना कायम संन्यासी, भिक्षु यांच्यापासून दूर ठेवायच्या. रामकृष्ण परमहंसांची स्तुती ऐकून स्वामी विवेकानंद त्यांना भेटायला गेले. रामकृष्ण परमहंसांना भेटल्यानंतर नरेंद्रचा त्यांना पहिला प्रश्न होता "तुम्ही देव पाहिलाय का ?" परमहंसांच्या पायावर डोके ठेवताच त्यांना आत्मानुभूती झाली.रामकृष्ण परमहंसांच्या भेटीचा नरेंद्रवर खूप प्रभाव पडला होता. ते अनेकदा दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांना भेटायला जायचे ज्यामध्ये त्यांना सतावणाऱ्या चिंतेचे विविध उपाय मिळाले.
 
fch
 
स्वामी विवेकानंदांच्या swami vivekanand वडिलांचे निधन झाले तेव्हा संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. दोन दिवस त्यांना नीट जेवणही मिळाले नाही. त्यांचा विश्वास होता की देव किंवा सर्वोच्च ऊर्जा असे काहीही नाही. ते रामकृष्णाकडे गेले आणि त्याने आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली, परंतु रामकृष्णाने नकार दिला आणि त्याला देवी कालीसमोर स्वतः प्रार्थना करण्यास सांगितले. पण त्यांना पैसा आणि संपत्ती मागता आली नाही म्हणून त्याने एकांत आणि विवेकासाठी प्रार्थना केली. त्या दिवशी त्यांना ज्ञानाचा अनुभव आला. मग त्यांचा रामकृष्णावर खरोखर विश्वास होता आणि त्यांनी त्यांना आपले गुरू म्हणून स्वीकारले. परमहंसांना समजले होते की, हाच आपला शिष्य ज्याच्या प्रतीक्षेत आपण आहोत. गुरूंनी नरेंद्रला  सांगितले. तुला ईश्वर प्राप्तीसाठी नाही तर समज कळण्यासाठी काम करायचे आहे. यानंतर तुला या समाजासाठी व आपल्या जनतेसाठी कार्य करायचे आहे. परमहंसांचा आदेश मानून त्यांनी धर्म जागृतीचे कार्य केले. रामकृष्ण  परमहंसांनी आपले सर्व ज्ञान विवेकानंदांना दिले आणि त्यांना सांगितले की शेवटी, तो दिवस आला आहे ज्यासाठी तुमचा जन्म झाला. रामकृष्णांनी त्यांना सांगितले की, आता जाऊन आमच्या वेदांचे ज्ञान आणि देशातील तरुणांना हिंदू धर्माचे महत्त्व समजावून सांग.
 
yuyt  
 
विवेकानंदांचे swami vivekanand शिक्षणविषयक विचार खूप महत्वपूर्ण व दिशादर्शक आहेत. स्वामी विवेकानंद यांचा त्यावेळच्या मेकाॅलेप्रणीत इंग्रजी शिक्षण पद्धतीला विरोध होता. कारण या शिक्षणाचा उद्देश फक्त नोकर वर्गाची संख्या वाढविणे हा होता. त्यांना असे शिक्षण हवे होते जेणेकरून मुलाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. मुलांच्या शिक्षणाचे उद्दीष्ट त्याला आत्मनिर्भर बनविणे आणि त्याच्या पायावर उभे करणे हे असावे असे त्यांचे मत होते. स्वामी विवेकानंद यांनी प्रचलित शिक्षणाला 'निषिद्ध शिक्षण' असे संबोधले होते आणि म्हटले की, "तुम्ही अशा व्यक्तीचा विचार करता ज्याने काही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत आणि तो चांगले भाषण देऊ शकतो, परंतु वास्तविकता अशी आहे की शिक्षण हा सर्वसामान्यांसाठी संघर्ष आहे. कोणी तयारी करीत नाही, कोणी चरित्र निर्माण करीत नाही, समाजसेवेची भावना कोणामध्ये विकसित होत नाही आणि जो सिंहासारखा धैर्य जोपासू शकत नाही, अशा शिक्षणाचा काय फायदा ?" अशी शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती. त्यांच्या मते, शिक्षणाद्वारे धर्मनिरपेक्ष आणि इतर जागतिक जीवनाची तयारी झाली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे धार्मिक शिक्षण पुस्तकांऐवजी प्रत्यक्ष आचरण आणि कर्मातून दिले पाहिजे. लौकिक व इतर जगातील विषयांना अभ्यासक्रमात स्थान दिले पाहिजे. त्यामुळे वैश्विक पातळीवर शिक्षणाचा संबंध जोडला जाईल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते शक्य तितके जवळचे असावे. शिक्षणाच्या प्रसिद्धीस प्रोत्साहन दिले पाहिजे आणि सामान्य लोकांमध्ये ते पसरले पाहिजे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. मानवी व राष्ट्रीय शिक्षण कुटुंबातून सुरू झाले पाहिजे. अशी शिक्षणाविषयी त्यांची भूमिका होती.  आताची आपली शिक्षण पद्धती मात्र, इंग्रजी झाली आहे. भारतीय संस्कृती आपली परंपरा यांची  आपल्याच लोकांना लाज वाटू लागली आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0