मुंबई,
Sunil Holkar : मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सुनील होळकर यांचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले आहे. सुनील होळकर हे लिव्हर सिरोसिसने त्रस्त होते. टीव्ही शो व्यतिरिक्त या अभिनेत्याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
वयाच्या ४० व्या वर्षी प्रतिभावान अभिनेते सुनील होळकर (Sunil Holkar) यांनी जगाचा निरोप घेतला. सुनील होळकर यांचे १२ जानेवारी रोजी निधन झाले. 13 जानेवारी रोजी अभिनेत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील होळकर 'तारक मेहता'च्या अनेक एपिसोडमध्ये दिसला होता. शोमधील त्याच्या छोट्याशा व्यक्तिरेखेने त्याने प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव टाकला. सुनील होळकर हे लिव्हर सिरोसिस या आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांना वाचवता आले नाही.
सुनील होळकर (Sunil Holkar) शेवटचे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटात दिसले होते. अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत त्यांनी अनेक वर्षे काम केले. ते 12 वर्षे रंगभूमीशी निगडीत होते. 'तारक मेहता' व्यतिरिक्त तो 'मोरया', 'मॅडम सर', 'मिस्टर योगी' सारख्या अनेक शोमध्ये दिसला होता. सुनील होळकर आपल्या कारकिर्दीच्या उंचीला स्पर्श करत होते. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांचे मन हेलावले.