कोराडी मंदिरात अन्नछत्र प्रसादम् भोजनाचा शुभारंभ

    दिनांक :14-Jan-2023
Total Views |
नागपूर,
कोराडी येथील महालक्ष्मी (koradi temple)  जगदंबा मंदिरात दररोज येणाऱ्या ५ हजार भाविकांना ३० रुपयांत प्रसादम् भोजन उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुक्रवार, 13 जानेवारीपासून शुभारंभ झाला. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व सदस्यांच्या उपस्थितीत अन्नछत्र प्रसादालयमचे उद्‌घाटन झले. पहिल्याच दिवशी सुमारे 5000 हून अधिक भाविकांनी प्रसादयालम् मध्ये भोजनाचा आस्वाद घेतला.
 

tytytytyt  
 
 
उद्घाटनाला हरे कृष्ण मुव्हमेंट भिलाईचे  (koradi temple)  अध्यक्ष व्योमपाद दास, कोराडी मदिर ट्रस्टचे सचिव दत्तू समरितकर, उपाध्यक्ष नंदू बजाज, कोषाध्यक्ष सुशीला मंत्री, लक्ष्मीकांत तळस्कर, अशोक खानोरकर, केशव महाराज फुलझेले, अॅड. मुकेश शर्मा, प्रभा निमोणे व प्रेमलाल पटेल, उपस्थित होते. अन्नछत्र प्रसादम् सुविधेमुळे परप्रांतातून येणाऱ्या भाविकांना माफक दरात भोजन मिळणार आहे. अन्नछत्र प्रसादालयम सभागृहात एकाच वेळी सुमारे 1000 लोक बसून भोजन भोजन करू शकतात. सकाळी सुमारे ३००० तर सायंकाळी २००० भाविकांना अन्नछत्र मध्ये प्रसाद ग्रहण करता येणार आहे. यासाठी हरे कृष्णा मुव्हमेंट या संस्थेसोबत जगदंबा मंदिर प्रशासनाने करार केला आहे.
 
मंदिरात दररोज मिळणाऱ्या    (koradi temple)अन्नछत्र प्रसादम मध्ये २ पोळ्या, भाजी, डाळ, भात व लोणचे मिळणार आहे. प्रसादम् मध्ये उच्च दर्जाचे धान्याचा वापर करण्यात येणार आहे. हरे कृष्णा मुव्हमेंट ही संस्था त्यांच्या दर्जदार अन्नपुरवठ्यासाठी ओळखली जात असल्याने त्यांना प्रसाद व भोजनासह फराळाचे साहित्य तयार करण्याचा करार करण्यात आला आहे. कोराडी मंदिरात दररोज राज्यातील विविध भागासह परप्रांतातूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. येथे येणाऱ्या भाविकांना जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी अन्नछत्र प्रसादम नावाने भोजन कक्ष तयार करण्यात येणार होता. हा कक्ष पूर्णपणे तयार झाला आहे.
 
(- सौजन्य संपर्क मित्र निखिल इंगळे)