जिल्हा कोषागारात ‘ई-कुबेर’ संगणकीय प्रणाली

    दिनांक :19-Jan-2023
Total Views |
अकोला,
E-Kuber जिल्हा कोषागारात ‘ई-कुबेर’ संगणकीय प्रणालीने कामकाज सुरू करण्यात आले. राज्यात जिल्हा कोषागारात या प्रणालीद्वारा कामकाज होणारा अकोला हा पहिला जिल्हा ठरला. शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते विनाविलंब देण्याकरिता ही प्रणाली उपयोगी ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाने शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते तथा विविध शासकीय योजनांच्या निधीचे वितरण गतीने व्हावे याकरिता रिझर्व्ह बँकेसोबत जिल्हा कोषागारात ‘र्ई-कुबेर’ प्रणाली राबविण्याबाबत करार केला. प्रायोगिक तत्वावर ही प्रणाली राबविण्यासाठी राज्याच्या वित्त, लेखा व कोषागारे संचालनालयाने अकोला जिल्हा कोषागारात ही प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला. गुरुवार, 12 जानेवारीपासून याप्रणालीद्वारे जिल्हा कोषागारात कामकाज सुरू करण्यात आल्याचे समजते.

FDRDTR6
 
‘ई-कुबेर’ प्रणालीमुळे शासकीय कर्मचार्‍यांच्या खात्यात तत्काळ आणि थेट रक्कम जमा करणे सोयीचे आहे. धनादेश वटविण्याची प्रक्रिया जलद होणार असून, विविध देयके अदा करण्याच्या प्रक्रियेतील टप्पे या प्रणालीत कमी होणार आहेत. E-Kuber शासनाद्वारे विविध योजनांसाठी प्राप्त निधी संबंधित विभागाच्या खात्यात दीर्घकाळ अखर्चित राहणार नाही. तसेच निधीच्या जमा-खर्चाच्या प्रक्रियेतील सुलभतेमुळे शासनाकडून नवीन निधी मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.