नागपूर,
मराठी साहित्यातील प्रतिभासंपन्न Ram Ganesh Gadkari कवी आणि नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय साहित्य परिषद, कलासंगम आणि केशवनगर सांस्कृतिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 23 जानेवारीला सायंकाळी 5.30 वाजता ‘स्मरण भाषाप्रभूंचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते कार्यक्रमाचे उदघाटक असून, आ. प्रवीण दटके हे प्रमुख अतिथी आहेत.
विदर्भ साहित्य संघाचे Ram Ganesh Gadkari सरचिटणीस विलास मानेकर तसेच दिलीप चिंचमलातपुरे आणि जयंत खळतकर हे विशेष अतिथी आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि आरेखन प्रकाश एदलाबादकर यांचे आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन विद्यालयाच्या लीलाताई जठार सभागृहात आयोजित या कार्यक्रमात ‘गडकर्यांची सिंधू’ हा एकपात्री प्रयोग डॉ. सुरुची डबीर सादर करतील. मनीषा अतुल, शलाका जोशी, विवेक अलोणी आणि प्रकाश एदलाबादकर गोविंदाग्रजांच्या निवडक कवितांचे अभिवाचन करतील. गुणवंत घटवाई, विशाखा मंगदे आणि सानिका रुईकर हे गडकर्यांच्या नाटकातील गाजलेली नाट्यपदे सादर करतील. राम ढोक (तबला) आणि अमोल उरकुडे (संवादिनी) यांची वाद्यसंगती असेल.
(सौजन्य:- संपर्क मित्र प्रकाश एदलाबादकर)