श्री महालक्ष्मी मंदिर मधुबन ले आऊट येथे कीर्तन महोत्सव

19 Jan 2023 19:23:14
नागपूर,  
कै.श्री प्रकाशराव पुरोहित यांचे स्मृती प्रित्यर्थ (Mahalakshmi Temple) श्री महालक्ष्मी मंदिर मधुबन ले आऊट मनीष नगरात दि.२१जानेवारी शनिवार ते सोमवार दि.२३जानेवारी सायंकाळी ७ वा.तीन दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.या कीर्तन महोत्सवात शनीवारी दि.२१ जानेवारी रोजी ह.भ.प.श्यामबुवा धुमकेकर.तर रविवार दि.२२रोजी ह.भ.प.शुभांगी चिंचाळकर कीर्तन सादर करणार आहेत.
 
Mahalakshmi Temple
 
महोत्सवाची सांगता सोमवार दि.२३ रोजी ह.भ.प.मोहनबुवा कुबेर यांच्या कीर्तनाने होणार आहे. कीर्तन महोत्सवात (Mahalakshmi Temple) प्रसिद्ध तबलावादक श्रीधर कोरडे तर प्रसिद्ध संवादीनी वादक पीतांबर पौनीकर ,तबला व संवादिनीची साथ देणार आहेत. या श्रवणीय कीर्तन महोत्सवाचा सर्व भावीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष शरदचंद्रजी लांबे व कोषाध्यक्ष आसावरी कोठीवान यांनी केले आहे.
 
 
- सौजन्य:आसावरी कोठीवान,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0