संत लहानुजी महाराजांचे निधन

    दिनांक :02-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
दर्यापूर,
तालुक्यातील श्री क्षेत्र अडुळाबाजार येथील श्री संत लहानुजी महाराज Sant Lanuji Maharaj यांचे वयाच्या 61 व्या वर्षी सोमवारी पहाटे अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. तालुक्यासह संपूर्ण विदर्भात संत लहानुजी महाराजांवर श्रद्धा असणारे हजारो भक्तगण आहेत. तालुक्यातील दर्यापूर ते अकोला रोडवर असणारे
 
Sant Lanuji Maharaj
 
श्री क्षेत्र अडुळा बाजार ही संत लहानुजी लहानुजी Sant Lanuji Maharaj महाराजांची कर्मभुमी आहे. अडुळाबाजार हे त्यांच्या मामांचे गाव तर बेलोरा ता. आर्वी जि. वर्धा या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला होत. लहानुजी महाराज म्हणजे साक्षात शेगावचे संत गजानन महाराज असल्याची भावना त्यांच्या भक्तगणाची आहे. महाराजांचा भक्त परिवार महाराष्ट्र भर पसरलेला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हजारो भक्तानी सोमवारी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. लहानुजी महाराज यांना मंगळवारी सकाळी 10 वाजता अडुळाबाजार येथे समाधिस्त करण्यात येईल, असे विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आले.