सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

21 Jan 2023 19:48:07
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
आझाद हिंद सेनेचे संस्थापक (Subhash Chandra Bose) नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना साडीचोळी वाटप तसेच गुणवंत विद्यार्थी व पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवार, 23 जानेवारी सकाळी 11 पासून स्थानिक नगर परिषद मंगल कार्यालय येथे औदुंबर बहुउद्देशीय संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
 
Subhash Chandra Bose
 
या (Subhash Chandra Bose) कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी खासदार सुभाष वानखेडे, तर अध्यक्ष म्हणून आमदार नामदेव ससाने यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रकाश देवसरकर, माजी आमदार उत्तम इंगळे, माजी आमदार विजय खडसे व माजी आमदार राजेंद्र नजरधने, तसेच प्राचार्य मोहन मोरे, तातू देशमुख, भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा, अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य राम देवसरकर, राजू जयस्वाल इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
 
 
या (Subhash Chandra Bose) कार्यक्रमात कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजय माने, जेष्ठ विधीज्ञ संतोष जैन, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक प्रमोद देशमुख, सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक पुण्यरथा नगारे, डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. आशिष उगले, पत्रकार नागेश गोरख, झी 24 तासचे श्रीकांत राऊत, पत्रकार अमोल ढोणे, आंतरराष्ट्रीय धावपटू विकास बालाजी मुळे यांच्यासह, 2022 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या सामाजिक उपक‘मास रक्तदाते, तसेच नागरिकांनी हजर राहावे असे आवाहन अध्यक्ष वसंत देशमुख व सचिव अरविंद ओझलवार, पदाधिकारी तथा सदस्यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0