अहमदाबाद,
2002 मध्ये झालेल्या (Godhra riots) गोध्रा दंगलीतील 22 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील न्यायालयाने हा निर्णय दिला. गोध्रा दंगलीत 17 जणांचा बळी गेला होता. याच प्रकरणी यातील 22 आरोपींना सबळ पुरावे नसल्याचे कारण देत निर्दोष मुक्त करण्यात आले.
पंचमहाल जिल्ह्याच्या हलोल शहरातील न्यायालयाने पुराव्याअभावी 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या (Godhra riots) सर्वांवर दोन मुलांसह अल्पसंख्यक समाजातील 17 जणांची हत्या केल्याचा आरोप होता. बचाव पक्षाचे वकील गोपालसिंह सोलंकी यांनी यासंदर्भात सांगितले की, अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांनी सर्व 22 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या हत्याकांडातील आठ आरोपींचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. 28 फेब्रुवारी 2002 रोजी ही दंगल घडली होती आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे मृतदेह जाळण्यात आले होते.
प्रकरण नेमके काय?
27 फेब्रुवारी 2002 रोजी पंचमहाल जिल्ह्यातील (Godhra riots) गोध्रा शहराजवळ जमावाने साबरमती एक्स्प्रेसची एक बोगी पेटवल्यानंतर जातीय दंगली उसळल्या. बोगी जाळण्याच्या घटनेत 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. ते अयोध्येहून परतले होते. देलोल गावात झालेल्या हिंसाचारानंतर हत्या आणि दंगलीशी संबंधित भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली 22 जणांना अटक केली होती.