मुंबई,
नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू (KL Rahul Wedding) केएल राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या विवाहानंतर क्रीडा व सिनेजगतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या दोघांच्या लग्नात दोघांच्या मित्र-मैत्रिणींकडून महागड्या भेटवस्तूंचाही वर्षाव करण्यात आला.
या महागड्या भेटवस्तू देणार्यांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंह धोनीसह अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. कोहलीने (KL Rahul Wedding) केएल राहुल व अथिया शेट्टीला विवाहानिमित्त 2.17 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. तर महेंद्रसिंह धोनीने या नवविवाहित जोडप्याला कावासाकी निन्जा बाईक भेट दिली आहे. ही बाईक धोनीच्या स्वतःच्या बाईक कलेक्शनमधील असून, या बाईकची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे. धोनीकडे डझनभर बाइक्सचं अप्रतिम कलेक्शन आहे.