नवी दिल्ली,
Hindu Rashtra : अलिगडच्या भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी बागेश्वर महाराजांचे समर्थन केले आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजप नेत्या रुबी आसिफ खान म्हणाल्या, बागेश्वर महाराजांवर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ते सामान्य माणसाबद्दल आणि त्यांच्या धर्माबद्दल बोलतात. लोकांना याचा त्रास का, हिंदू राष्ट्राबाबत बोलायचे तर भारताला हिंदू राष्ट्र घोषित करायला हवे, असे त्या म्हणाल्या.
रुबी खान म्हणाल्या, भारताला हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) घोषित केल्यास येथील सर्व लोक एकत्र राहतील, म्हणूनच हिंदू राष्ट्र घोषित केले पाहिजे. मुल्ला, मौलवी जेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे काम करतात, त्यांच्यावर कोणाचाही आक्षेप नसतो, मग बागेश्वर महाराजांना लोकांची अडचण का. बागेश्वर महाराज ज्या पद्धतीने सनातन धर्माविषयी बोलतात, तसेच जो कोणी त्यांच्या इच्छेने बागेश्वर महाराजांच्या निवासस्थानी पोहोचतो, त्यांची इच्छा पूर्ण होते. भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी बागेश्वर महाराजांचे समर्थन करत भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासंदर्भात चर्चा केली.
बागेश्वर महाराजांना त्यांच्या तरुण वयातच एवढी कीर्ती मिळाली आहे की, आता त्यांनी समाजातील प्रत्येक घटकात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. देशाला हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) बनवण्यासोबतच बागेश्वर महाराज आपल्या धर्माला पुढे नेण्याचे कामही करत आहेत, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रुबी खान पुढे म्हणाल्या, बागेश्वर महाराजांना समर्थन देते आणि बागेश्वर महाराज भारताला हिंदू राष्ट्र बनवतील त्यांच्या या विचारांशी मी सहमत आहे. रुबी आसिफ खान यांची हिंदू धर्मासोबतच मुस्लिम धर्मावर देखील विशेष श्रद्धा आहे. त्या हिंदूंचे प्रत्येक सण उत्तम प्रकारे साजरे करतात, तसेच पूजेसोबत नमाजही अदा करतात. त्या म्हणतात, मौलवी फक्त दिखावा करतात आणि कोणत्याही दिखाव्यात न येता ती दोन्ही धर्मांवर विश्वास ठेवते, त्यामुळे ती दोन्ही धर्मांची खऱ्या मनाने पूजा करते.