हिंगणघाटात परीक्षा पे चर्चा या उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धा

25 Jan 2023 19:47:24
तभा वृत्तसेवा 
हिंगणघाट, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यभरात परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन स्थानिक शिव सुमन मंगल कार्यालयातही चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
 
Pariksha Pe Charcha
 
चित्रकला स्पर्धेत नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील अनेक विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते, उपरोक्त चित्रकला स्पर्धेकरिता आभासी माध्यमाद्वारे नोंदणी करण्यात आली, यामध्ये जिल्ह्यातून जास्तीतजास्त हिंगणघाट तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. आ. समीर कुणावार यांनी चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या कलागुणाचे परीक्षण केले. यावेळी त्यांनी मोबाईलचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन यावेळी केले. उज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थी दशेत परिश्रम करण्याचा सल्ला देऊन दिला.
Pariksha Pe Charcha 
 
या स्पर्धेचे (Pariksha Pe Charcha) नियोजन हिंगणघाट पंचायत समितीचे शिक्षण विभागांतर्गत करण्यात आले होते. 570 विद्यार्थ्यां सहभागी झाले. स्पर्धेसाठी जी -20 जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आजादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राइक, कोरोना लसीकरणमध्ये भारत नंबर -1, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योग दिन मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाव बेटी पढाव, चुलीच्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला मोदींचा संवेदनशील निर्णय हे विषय होते.
 
 
यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत भोयर, गटशिक्षणअधिकारी अल्का सोनवणे, विस्तार अधिकारी सुभाष टाकळे, अरविंद राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी अंकुश ठाकूर, छाया सातपुते, अनिता मावळे, नलिनी सयाम, कविश्वर इंगोले, तुषार येणोरकर, गौरव तांबोळी, तुषार आंबटकर यांनी सहकार्य केले.
 
Powered By Sangraha 9.0