पर्यटन म्हंटले की डोळ्यासमोर उभ्या राहतात (national tourism day) त्या दऱ्या-खोऱ्या ! उंच्च-उंच डोंगर...विशालकाय समुद्र, अरुंद पण थ्रिल आणणारी पायवाट, भूर भूर पाऊस, हातात एक कप चहा आणि....अर्थात कांदा भजी!! अहा एकदम परफेक्ट! प्रत्येकाच्या पर्यटनाच्या संकल्पना वेग वेगळ्या असतात...कोणाला, सहारा वाळवंट आठवते, तर कोणाला कुल्लूचा गारठा, कोणी इतिहासाच्या प्रेमात असते तर कोणी नक्षी कामाच्या, कोणी खाद्य संस्कृतीच्या तर कोणी वेषभूषा -अलंकाराच्या, कोणी रंगाच्या, कोणी पतंगांच्या... आज २५ जानेवारी, राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. काय विशेषतः आहे आजच्या दिवसाची ? चला जाणून घेऊया ..