तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर

27 Jan 2023 18:44:58
- सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार : बाबूसिंग महाराज
 
जामनेर, 
अ. भा. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाची सुरुवात झाली. आठ राज्यांत 11 हजार तांड्यावर प्रत्यक्ष संपर्क करून 3 हजार तांड्यावर ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून Banjara community बंजारा बांधवांचे धर्मांतर झाले. त्या सर्वांना पुन्हा सनातन हिंदू धर्मात परत आणणार आहोत. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज जागृत करण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी कुंभ आयोजित करण्यात आला असल्याचे संत बाबूसिंग महाराज यांनी सांगितले. धर्म सभेत मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर संत बाबूंसिंग महाराज, शरदराव ढोले, महामंडलेश्वर गुरू शरणानंद, संत गोपाल चैतन्य महाराज, संत सुरेश महाराज, संत देनाभगत महाराज, संत यशवंत महाराज, संत जितेंद्रनाथ महाराज, आचार्य साहेबराव शास्त्री, महंत संग्रामसिंग महाराज, संत रायसिंग महाराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
 

Banjara-Kumbh-2 
 
भारताचे वैभव पाहून परकीय आक्रमणे झाली. ज्या ग्रीकांनी आक्रमण केले होते, ते हिंदू झाले. इस्लामचे आक्रमण वेगळे होते. ते क्रूर होते. तलवारीच्या जोरावर लाखो लोकांचे धर्मांतरण केले. इसाईच्या माध्यमातून छण, कपट आणि सेवेच्या माध्यमातून धर्मांतरण सुरू झाले. हे धर्मांतरण पूजा-पद्धती पुरते मर्यादित न राहता वेगळे राज्य आणि वेगळ्या देशाच्या मागणीने सुरू झाले. पूर्वांचलमध्ये 7 पैकी 4 राज्यांमध्ये ख्रिस्तीकरण झाले. 11 हजार Banjara community बंजारा तांड्यापैकी 3 हजार तांड्यांचे धर्मांतरण झाले आहे. Banjara community बंजारा समाजाचे धर्मांतरण होऊ नये, यासाठी तसेच धर्मांतरण थांबविण्यासाठी शेकडो संत येथे आले असल्याचे शरदराव ढोले यांनी सांगतिले.
 
 
संत गोपाळ चैतन्य महाराज यांनी, कुंभात सर्व महापुरुषांना आमंत्रित केले आहे. संत समाज धर्म रक्षणाचे काम करतो. तीन हजार गावांत धर्म परिवर्तन झाले म्हणून कुंभाची गरज पडली. हिंदू समाजात जागृती होण्यासाठी आणि धर्म रक्षणासाठी हा कुंभ आहे असे सांगितले. संत बाबूसिंग महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात Banjara community बंजारा समाजाच्या कुंभात मथुरेहून संत उपस्थित राहिले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यातील समाज आणि संत कुंभात सहभागी झाले आहेत. गोर बंजारा व लबाना नायकडा समाजात महान संत घडून गेले आहेत. समाज संघटित होण्यासाठी हा कुंभ आहे. भक्ती मार्गातून दिशा मिळते. समाजाला जागृत करण्यासाठी संत व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. बंजारा समाजाचा प्रथम कुंभ गोद्री येथे होत असून, हा ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. संत सुरेश महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात भारत मातेला आपण माता म्हणतो. आम्ही सनातनी आहोत आणि सनातनी राहू. सीमेवर सैनिक देश आणि भारत मातेच्या रक्षणासाठी उभा असतो तर, धर्मासाठी संत समाजात उभे असतात असे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0