संकेत आश्रमशाळेत बालिका दिन साजरा

    दिनांक :03-Jan-2023
Total Views |
नागपूर,
स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत (Balika divas) आणि स्त्री स्वातंत्र्याच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने संकेत प्राथमिक शाळा व माध्यमिक आश्रमशाळा चिमणाझरी, नागपूर येथे बालिका दिन साजरा करण्यात आला.
 
Balika divas
 
त्यानिमित्ताने भाषणे (Balika divas) आणि वेशभुषा करून, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी. बी. मांडे होते. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वरी ठाकरे यांनी केले तर आभार विनोद अड्डे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.
 
 
- सौजन्य : संपर्क मित्र विनोद अड्डे