गडचिरोली,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
म. गांधी महाविद्यालय आरमोरी
आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विकास व सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने (Savitribai Phule) सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. दिलीप घोनमोडे, महिला विकास व सुरक्षा समिती प्रमुख प्रा. सुनंदा कुमरे, रासेयो प्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के, प्रा. स्नेहा मोहूर्ले, प्रा. कविता खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सीमा नागदेवे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सतेंद्र सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन काळबांधे, किशोर कुथे, सचिन ठाकरे, शीला घोडीचोरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राजे धर्मराव हायस्कूल महागाव
आलापल्ली येथून जवळच असलेल्या महागाव येथील राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात महिलाराजच्या सहकार्याने स्त्री शिक्षणाच्या खर्या देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी इयत्ता पाच ते दहावीच्या मुलींनी सावित्रीबाईंवर गीत व भाषणातून आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहा गेडाम तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी वेलादी, तेजश्री कांबळे, रूपाली झाडे, वैष्णवी आलाम, साक्षी पेंदाम, वेदिका वेलादी, लक्ष्मी चेन्नूरवार, आचल अनमलवार, प्राची मंडरे, साक्षी डोके, अनन्या चेंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन नम्रता टेकूल तर आभारप्रदर्शन भवानी मंदा यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक यावले, शिक्षिका सुवर्णा गौरकार व इतर शिक्षकांनी केले.
जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली
भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या थोर समाजसुधारक, पहिल्या महिला शिक्षिका कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्यावतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, काँग्रेस नेत्या माजी जिप सदस्य कुसुम अलाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा सचिव सुनील चटगुलवार, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत पा. राऊत, काँग्रेस नेते भैय्याजी मुद्दमवार, अब्दुलभाई पंजवानी, राकेश रत्नावर, गौरव आलम, सदाशिव कोडापे, बाबुराव गडसुलवार, मिलिंद बारसागडे, रुपेश सलामे, सुदर्शन उंदीरवाडे, सुधीर बांबोडे, अमित चांदेकर, रजत धकाते, तया खान उपस्थित होते.
गोंडवाना सैनिकी विद्यालय
गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात 3 जानेवारी रोजी देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती (Savitribai Phule) सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव गोसावी, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले विद्यालयाचे पर्यवेक्षक अजय वानखेडे, देवेंद्र म्हशाखेत्री यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन संतोष कुळमेथे तर आभारप्रदर्शन रहीम पटेल यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
जामगिरी, फराडा
चामोर्शी तालुक्यातील जामगिरी व फराडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी, सरपंच भैय्याजी वाढई, खुशाल वाढई, पांडुरंग वाढई, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, शेषराव कोहळे, माजी पंस सदस्य संगीता भोयर, देवीदास भोयर, चंद्रशेखर साखरे, वातुजी वसाके, उमाजी शेंडे, विलास कासेवार, प्रमोद वाढई, धनराज गुरनुले, समाजबांधव, मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.