अवनी चतुर्वेदीने प्रथमच विदेशात उडविले सुखोई विमान

30 Jan 2023 19:13:30
नवी दिल्ली,
वीर गार्डियन-2023 या भारतीय दलाचा भाग बनलेली (Avni Chaturvedi) देशाची पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी हिने पहिल्यांदाच विदेशात झालेल्या भारत-जपान मधील पहिल्या संयुक्त हवाई युद्धसरावात भाग घेतला. त्यामुळे तिचे देशभरात अभिनंदन होत आहे. जपानमध्ये 16 ते 26 जानेवारी या कालावधीत संयुक्त हवाई युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले. यात भारतीय वायुसेनेकडून चार सुखोई-30 एमकेआय, दोन सी-17 आणि एक आयएल-78 विमान, तर जपानकडून चार एफ-2 आणि चार एफ- 15 लढाऊ विमान सहभागी झाले. या सरावात अवनीने लढाऊ विमानाचे उड्डाण केले. (Avni Chaturvedi)  स्क्वाड्रन लीडर अवनी ही जून 2016 मध्ये बनलेल्या तीन महिला फायटर पायलटांपैकी एक आहे.

Avni Chaturvedi
 
अवनी चतुर्वेदी
फायटर जेट उडविण्यास सक्षम असलेली पहिली भारतीय महिला पायलट (Avni Chaturvedi) अवनी चतुर्वेदी आपत्कालीन स्थितीत सुखोई यासारखे विमान सुद्धा उडविण्यात तरबेज आहे. मध्यप्रदेशातील रिवा येथे जन्मलेल्या अवनीने राजस्थानातील वनस्थली विद्यापीठातून संगणक विज्ञान शाखेतून बी. टेक. पदवी प्राप्त केली. महाविद्यालयातील फ्लाईंग क्लबमधून विमान उडविण्याची कला अवगत केल्यानंतर हैदराबादेतील एअरफोर्स अकादमीतून सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करीत फायटर स्क्वाड्रनमध्ये प्रवेश केला. दरम्यान, सध्या भारतीय वायुसेनेत 17 महिला फायटर पायलट असून, भारतीय लष्कर आणि नौदलामध्ये एकूण 145 महिला हेलिकॉप्टर आणि (Avni Chaturvedi) मालवाहक पायलट आहेत.
Powered By Sangraha 9.0