समन्वय, आत्मीयतेतून समाजात बदल घडू शकतो

- प्रमुख वक्त्या वैशाली फडणीस यांचे प्रतिपादन
- राष्ट्र सेविका समितीचा मकर संक्रांत उत्सव

    30-Jan-2023
Total Views |
अकोला, 
Rashtra Sevika Samiti : आपला हा समाज उत्सवप्रिय आहे. या समाजात बदल घडवायचा असेल तर समन्वय साधून आणि आत्मीयतेच्या वर्तनातून तसा बदल घडू शकतो. राष्ट्र सेविका समिती व्यक्ती निर्माणाचे कार्य सदैव करत आहे. जर हिंदू लोक सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे जरी एकत्र येऊन प्रार्थना करतील तर हिंदू समाज सगळ्या जगात अजिंक्य होईल, असे प्रतिपादन वैशाली फडणीस यांनी येथे केले. राष्ट्र सेविका समितीअकोला महानगराचा मकर संक्रात उत्सव रविवार, 29 रोजी जठारपेठ स्थित म्हाळसा देवी पब्लिक स्कूल 5 शाळा येथे साजरा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विकास केंद्र कर्णबधीर व बाल विकास विशेष शाळेच्या सर्वेसर्वा सुचिता बनसोड होत्या.
  
Rashtra Sevika Samiti
 
या (Rashtra Sevika Samiti) कार्यक्रमास म्हाळसा देवी शाळेच्या अपूर्वा कुलकर्णी, नगर कार्यवाहिका वैशाली कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या चिखली येथील आदर्श शाळेच्या वैशाली फडणीस यांनी ध्वजारोहण, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. त्या आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, राष्ट्र सेविका समिती सर्व उत्सव सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन साजरे करते. उत्सवाचे स्वरूप सामूहिक व सामाजिक असते. हिंदू समाज पूर्वीपासूनच उत्सवप्रिय, त्यातून संस्कृतीचे दर्शन घडविते. हिंदू जीवनपद्धती ही निसर्गाशी सुसंगत आहे. समाज संघटित असला पाहिजे. परस्परातील स्नेह, आत्मीयता, बंधुभाव यावर समाजाचे संघटन व सामूहिक जीवन अवलंबून आहे हे लक्षात घेऊन मकरसंक्रमणासारखा उत्सव सामाजिक जीवनात किती महत्त्वाचा आहे, हे समजते असे त्या म्हणाल्या.
 
 
मकर संक्रात उत्सव आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो. विविध प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी जरी साजरा होत असलातरी भावना मात्र एकच असते. आत्मविस्मृतीच्या अंध:कारातून जागृतीच्या व चैतन्याच्या प्रकाशाकडे नेण्याचे कार्य म्हणजे समितीचे (Rashtra Sevika Samiti) कार्य होय असेही वैशाली फडणीस यांनी सांगितले. विविध स्पर्धा, गीत, तीळगूळ वितरण, ध्वज अवतरण आणि शेवटी भक्ती बिडवई यांच्या वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली. गीत सीमा मुळे, संचालन वैशाली कुलकर्णी, प्रार्थना शुभ्रा दीक्षित यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यास स्वाती जोशी, पूर्वा कायंदे, जयश्री मानोरकर, शाळेतील कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. याप्रसंगी अकोला जिल्हा कार्यवाहिका अंजली चिंचवडकर. सहकार्यवाहिका शुचिता जोशी, शिवानी जऊळकर, वैष्णवी देशमुख, स्नेहल ठोकळ, ध्वनी भाटिया, समितीच्या इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या.