श्री गजानन महाराज प्रसंग कथन

- स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिके

    30-Jan-2023
Total Views |
नागपूर, 
श्री गजानन महाराज (Gajanan Maharaj) अध्ययन समुह नागपूरतर्फे 29 जानेवारीला श्री गजानन महाराज प्रसंग कथन स्पर्धा धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयात वयोगट 4 ते 8 व 9 ते 12 या बालकांसाठी घेण्यात आली. 4 ते 8 या वयोगटात कस्तुरी जोशी हिला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे रेयांश वर्‍हाडपांडे, सई वैद्य व अन्विका टिकलकर यांना मिळाली.
 
Gajanan Maharaj
 
9 ते 12 या वयोगटात प्रथम क्रमांक अनय पिंपरकर याला तर द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे आनंदी मिराशे, स्वरा चन्ने, मैत्रेयी चारथळ व आराध्या लाखे यांना मिळाली. दर्शना भालेराव व शीतल गिरिधर यांनी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून काम केले. अ गटासाठी सिमंतिनी मुजुमदार, अलका चिडले, वैष्णवी दाणी तसेच ब गटासाठी संजय घटाटे, रिटा हारोडे व सुरेश लोटे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांचा सत्कार रश्मी भालेराव, सुरेखा देशपांडे, श्रीलेखा देवरस यांनी केला.
 
कार्यक्रमाची सुरुवात आराध्या पात्रीकर, स्वरा चन्ने यांच्या गुरुवंदनेने झाली. सतीश देवरस, रमेश भालेराव व निलय देशपांडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, अभिनंदन पत्र व रोख पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल गिरीधर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. भालचंद्र देशपांडे यांनी केले. श्री गजानन महाराजांच्या (Gajanan Maharaj) जयकाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
       सौजन्य : डॉ. भालचंद्र देशपांडे (संपर्क मित्र)