बारामती,
विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौर्यावर आहेत. आज अचानक Ajit Pawar अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अजित पवार हे विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबारासाठी आले होते. या इमारतीच्या गेटच्या आत कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नव्हता. येथे येणार्या प्रत्येक व्यक्तीची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू होती.
विद्या प्रतिष्ठानमध्ये अचानक पोलिसांची सं‘या वाढवण्यात आली. मात्र, अजित पवार यांच्या सुरक्षेत अचानक का वाढ करण्यात आली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. अजित पवार हे आठवड्यातून एकदा बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार भरवतात. आजही Ajit Pawar अजित पवार जनता दरबारसाठी येथे आले असता, अचानक त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यांना भेटण्यासाठी, आपल्या समस्या सांगण्यासाठी नागरिक येथे गर्दी करीत असतात. अजित पवार नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात. आज मात्र अचानक त्यांच्या सुरक्षेत वाढ झाल्यामुळे आणि नागरिकांना आत प्रवेश दिला जात नसल्याने गेटबाहेर गर्दी झालेली दिसून आली होती.