नागपूर,
नवीन वर्षाच्या सुरुवातीला मंगळवार, ३ जानेवारीला मैत्री परिवार संस्थेद्वारा संचालित विद्यार्थी उन्नती ग्रृहातील मुलांची स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे (Dr. Arjun Singh Rana) कुलगुरू डॉ. अर्जुन सिंग राणा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्पोर्ट्स आणि फिजिकल एज्युकेशनचे डायरेक्टर डॉ. शरद सूर्यवंशी तसेच प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा येथील प्राचार्य डॉ. सोनाली शिरभाते यांनी भेट घेतली.
सर्व प्रमुख पाहुण्यांचे मुलांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. डॉ. शरद सूर्यवंशी यांनी (Dr. Arjun Singh Rana) डॉ. अर्जुन राणा यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. अर्जुन राणा (Dr. Arjun Singh Rana) यांचा सत्कार शाॅल, श्रीफळ व मैत्री परिवार संस्थेचे या वर्षीचे नवीन कॅलेंडर देऊन करण्यात आला. त्यांनी मुलांना स्पोर्ट्स संबंधी अनेक उदाहरणे देत माहिती दिली आणि मुलांना स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी पाहायला आणि गुजरात दर्शना करिता आमंत्रित केले. सर्व मान्यवरांचे आभार दिलीप ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. अनिल यावलकर, रोहित हिमते, प्रकाश रथकंठीवार, गजानन रानडे आणी बंडू भगत उपस्थित होते.
- सौजन्य : संपर्क मित्र रोहित हिमते