जनरल दीपक कपूर यांच्या भारत जोडो यात्रेतील सहभागावरून आरोप-प्रत्यारोप

09 Jan 2023 19:20:19
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
माजी लष्करप्रमुख जनरल (Deepak Kapoor) दीपक कपूर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजपाने त्यांच्या यात्रेतील सहभागावर आक्षेप घेतला, तर काँग्रेसने भाजपावर हल्ला चढवला आहे. भाजपा देशाच्या वीर जवानांना बदनाम करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
 
Deepak Kapoor
 
दीपक कपूर (Deepak Kapoor) यांच्या नेतृत्वात सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍यांचा एक गट हरयाणातील कुरुक्षेत्र येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाला होता. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावर आक्षेप घेतला. दीपक कपूर आणि अन्य वरिष्ठ लष्करी अधिकारी आदर्श घोटाळ्यात आरोपी होते, पण ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले, असे ट्विट मालवीय यांनी केले.
 
 
याला काँग्रेसच्या आयटी सेलच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी प्रत्युत्तर दिले. (Deepak Kapoor) दीपक कपूर 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धातील योद्धे होते. अनेक लष्करी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 1967 ते 2010 अशी चार दशके त्यांनी देशाची सेवा केली. देशाच्या बहादूर वीरांना बदनाम करण्यासाठी तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे श्रीनेत यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश आणि काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनीही भाजपावर टीका केली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि जनरल (Deepak Kapoor) दीपक कपूर यांच्यावर अरुण जेटली यांनी काही खोडसाळ आरोप केले होते, पण या आरोपासाठी त्यांना न्यायालयात माफी मागावी लागली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Powered By Sangraha 9.0