तिसर्‍या - चौथ्या रेल्वे लाइनचे काम वेगाने

01 Oct 2023 21:27:41
नागपूर, 
Railway project : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत दिल्ली, हावडा व चेन्नई या तिन्ही रेल्वे मार्गांवर रेल्वे गाड्यांची संख्या सतत वाढत असल्याने तिसर्‍या व चौथ्या रेल्वे लाइनचे काम प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जात आहे. आतापर्यंत 2045.30 कोटींचा खर्च झाला असून इटारसीपर्यंत तिसर्‍या लाइनचे काम केल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

Railway project
 
इटारसीपर्यंत तिसर्‍या लाइनचे काम सुरु
रेल्वे प्रकल्पाअंतर्गत Railway project नागपूर-वर्धा तिसरी व चौथी लाइन तसेच नागपूर- इटारसी तिसरी लाइनचे काम केल्या जात आहे. यासाठी एकूण 3627.88 कोटींचा खर्च आहे. यात आतापर्यंत 2045.30 कोटींचा खर्च झाला आहे. तर इटारसीपर्यंत तिसर्‍या लाइनचे काम केल्या जात आहे.
 
 
125 गाड्या दररोज धावतात
मध्यवर्ती नागपूर Railway project रेल्वे स्थानकावरुन 125 गाड्या दररोज धावतात. त्यामुळे नागपूरचे महत्व सर्वाधिक आहे. यानंतर रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी तिसरी व चौथी लाइन पूर्ण करणे आवश्यक झाले आहे. नागपूर ते सेवाग्राम दरम्यान तिसरी व चौथी लाइनचे काम केले जात आहे. इटारसी मार्गावर तिसर्‍या लाइनचे काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिगाव- चिचोंडा आणि मरामझिरी - धाराखोह स्थानकांदरम्यान घाट सेक्शन असल्याने वेळ लागत आहे. नरखेड,पांढुर्णा, आमला-बैतूल दरम्यान तीव्र वळण असल्याने हे कार्य आव्हानात्मक झाले आहे.
 
 
23 टक्के अधिग्रहण शिल्लक
वर्धा मार्गावरील 78.70 किमीच्या तिसर्‍या व चौथ्या लाइनवर 34.59 किमीचे काम पूर्ण झाले असून 27.14 किमीचे काम लवकरच पूर्णत्वास येईल, असा विश्वास तुषारकांत पांडे यांनी व्यक्त केला. Railway project  वर्धा मार्गावर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून इटारसी मार्गावर अजूनही 23 टक्के अधिग्रहण शिल्लक आहे. या मार्गावर तिसर्‍या लाइनसाठी 99.25 हेक्टर जमिनीची गरज आहे. इटारसी मार्गावर 297 किमीच्या तिसर्‍या लाइनपैकी 96.95 किमीचे काम पूर्ण झाले असून 22.46 किमीचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे.
Powered By Sangraha 9.0