‘स्वच्छ शहर सुंदर शहर’चा दारव्हा नपने घेतला ध्यास

01 Oct 2023 20:35:57
दारव्हा, 
clean city-beautiful city : स्वच्छ शहर सुंदर शहर नगरपरिषद दारव्हातर्फे 1 ऑक्टोबर 2023 ला एक तास एक साथ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या स्वच्छता दिवस म्हणून नगर परिषद दारव्हाद्वारा संपूर्ण गावचा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नगर परिषद तसेच खाजगी शाळेचे प्राचार्य मु‘याध्यापक, शिक्षक, कर्मचारी या कार्याकरिता उपस्थित होते.
 
clean city-beautiful city
 
शहरातील सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, राजकीय पक्ष व नागरिकांनी यात सामाजिक संघटना ज्येष्ठ नागरिक मंडळ, माजी सैनिक संघटना, संघर्ष दल, मास्टर अ‍ॅथलेटिक्स संघटना, विरजी भिमजी घेरवरा विद्यालय, बचतगट, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग अन्य संघटना यांनी सहभाग घेत शहरातील स्वच्छता केली. clean city-beautiful city नागरिकांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, आपले शहर सुंदर आणि स्वच्छ असावे, स्वच्छतेचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचावे, महात्मा गांधी जयंती पर्वावर हा उपक‘म राबविण्यात आला. या कार्यक‘माचे आयोजन दारव्हा नगर परिषद प्रशासक तथा मु‘याधिकारी विठ्ठल केदारे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0