एसटीच्या चालक-वाहकाला शिवीगाळ; बसफेरी बंद

11 Oct 2023 20:04:54
तभा वृत्तसेवा
तळेगाव (श्या.पं.), 
ST bus stop : आष्टी तालुक्यातील चामला येथील विद्यार्थ्यांना ने-आण करणार्‍या एसटी बसच्या चालक-वाहकाला गावातीलच एका कुटुंबातील लोकांनी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ही बसफेरी बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला. ही बाब लक्षात येताच पालकांसह विद्यार्थ्यांनी पोलिस ठाणे गाठून चार जणांविरुद्ध तक्रार देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
ST bus stop
 
मिळालेल्या माहितीनुसार, चामला येथे जाणारी ST bus stop बसफेरी ग्रामपंचायत सदस्य मधुकर मोकद्दाम यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाली. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना नियमित शाळेत जाण्याचा मार्ग सुकर झाला होता. ही बससेवा सुरळीत असताना मंगळवार 10 रोजी दुपारी 12 वाजता बस गावात आली आणि गावातील गजानन बिटणे यांनी चालकाला बस माझ्या घरापाशी मागे पुढे का घेता म्हणून वाद घातला. यातच बिटणे यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करून चालक आणि वाहकाला जिवे मारण्याची धमकी दिली. वाद बघता गावकर्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी विजय बिटणे, किसना बिटणे, विठा बिटणे गावकर्‍यांना धमाकाऊ लागले.
 
 
गावकर्‍यांनी चालक, वाहकांची बाजू घेऊन वाद सोडवला. मात्र, दुसर्‍या दिवशी ही ST bus stop बस गावात पोहचलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसची वाट पाहून थकलेल्या पायांनी घर गाठले. दरम्यान, गावकरी आणि विद्यार्थ्यांनी तहसीलदार सचिन कुमावत यांची भेट घेत निवेदन दिले. तेथून थेट पोलिस स्टेशन गाठून ठाणेदार सुनीलसिंग पवार यांना तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर मोकद्दाम, सुरेश मदणकर, वासुदेव नेहारे, वासुदेव युवनाते, रामचंद्र मदणकर, देवका धुर्वे, अर्चना केवटे, नलू नेहारे, कल्पना घाटवाडे, मारोती घटी यांच्यासह गावकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0