नवी दिल्ली,
Hemkund Sahib temple : जगप्रसिद्ध हेमकुंड साहिब आणि लक्ष्मण लोकपाल मंदिराचे दरवाजे आज हिवाळ्यासाठी बंद करण्यात आले आहेत. दुपारी ठीक दीड वाजता शुभ मुहूर्तावर दरवाजे बंद झाले. या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी दोन हजारांहून अधिक भाविक हेमकुंडावर पोहोचले. दरवाजे बंद होण्याच्या एक दिवस आधी हेमकुंड साहिबमध्ये बर्फवृष्टी झाली. त्यामुळे धाममध्ये थंडी वाढली होती.
चमोली जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून 15225फूट उंचीवर असलेल्या (Hemkund Sahib temple) गुरुद्वारा हेमकुंड साहिब आणि लोकपाल लक्ष्मण मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. श्री हेमकुंड साहिब मॅनेजमेंट ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्रजीत सिंह बिंद्रा यांनी गोविंदघाट येथे ही माहिती दिली. बिंद्रा म्हणाले की, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथून मोठ्या संख्येने यात्रेकरू कपतबंधी पाहण्यासाठी गोविंदघाट आणि घनघरिया येथे पोहोचले.
यावर्षी आतापर्यंत 1.75 लाख भाविकांनी दरबार साहिब येथे दर्शन घेतले आहे. बिंद्रा यांनी सांगितले की 11 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता धामचे दरवाजे बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सकाळी 11.15 वाजता सुखमणी साहिब पठणानंतर शब्द-कीर्तन झाले. (Hemkund Sahib temple) सुमारे पाऊण तासानंतर या वर्षातील शेवटची प्रार्थना वाचण्यात आली. यंदा हेमकुंड साहिबचे दरवाजे 20 मे रोजी उघडण्यात आले. चमोलीच्या उंच शिखरांवर मंगळवारी बर्फवृष्टी झाली, आज बुधवारी सकाळपासूनच ऊन पडत आहे. हेमकुंड साहिबसोबतच बद्रीनाथ आणि केदारनाथ धाममध्येही वातावरण प्रसन्न झाले आहे.