Umarkhed Assembly देशात निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व सर्वच स्थानिक निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी चालू केली असून इच्छुक उमेदवारांची चाचणीसुद्धा वरिष्ठ नेते मंडळी करीत आहे. यातच उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्रात सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार मतदारसंघातील भेटी-गाठी व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहेत. यातच भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेनेची दोन्हीं गट, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही), वंचित बहुजन आघाडी, मनसे तर राज्याच्या राजकारणात नव्याने दाखल झालेल्या भारतीय राष्ट्र समिती पक्षांनी आघाडी घेतली आहे.
या विधानसभेवर गेल्या दशकामध्ये भारतीय जनता पार्टीला आपल वर्चस्व कायम ठेवण्यात येत यश आलें. तर काँग्रेसला दोन्ही निवडणुकांमध्ये पानिपत नशिबी आल्याने, काँग्रेसने आता मरगळ झटकून पुन्हा एकदा संघटन बांधणी, सामजिक उपक्रम व पक्षांचे कार्यक्रम राबविण्यात आघाडी घेतली आहे. माजी आमदार विजय खडसे यांना दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने धूळ चारल्यामुळे काँग्रेस आता नवखा उमेदवार रिंगणात उतरवनार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगत आहे. यात उच्चविद्याविभूषित असलेले व प्रशासकीय खात्याचा दांडगा अनुभव असलेले माजी प्रशासकीय अधिकारी साहेबराव कांबळे बेलखेडकर यांच्या रुपाने आपला हुकुमी एक्का टाकून या गडात भाजपाला शह देण्याचा चंग बांधत आहे. सद्यस्थिती साहेबराव कांबळे यांनी मतदारसंघातील सर्व गावांना भेटीगाठी देऊन अनेक गावांमध्ये लोक उपयोगी कामे करीत आहे. यामुळे कांबळे मतदारसंघातील जनतेपुढे एक नवा पर्याय म्हणून उभे राहत आहे.Umarkhed Assembly या विधानसभा मतदारसंघाला आपला बालेकिल्ला बनविलेल्या भाजपाला विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांच्या कर्तव्यशून्य कारकिर्दीमुळे ही निवडणूक भाजपाला अवघड जाण्याची चिन्हे दिसत आहेत. याचीच भणक लागताच येत्या निवडणुकीत भाजप आपली उमेदवारी अन्य कार्यकर्त्यांस देऊन हा बालेक्रि अबाधित राखण्याचा प्रयत्न करणार.या परिस्थितीत भाजपाकडे 2014 ची यशस्वी कारकीर्द राहिलेले माजी आमदार राजेंद्र नजरधने व किसन वानखेडे या चेहर्यांचा पर्याय आहे. नजरधने यांची कारकिर्द यशस्वी राहीली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपकडून नजरधने यांना उमेदवारी दिल्यास भाजपा या निवडणुकीत विरोधी पक्षांना तगडे आव्हान देऊ शकेल. मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या रिपाई (आठवले) गटाकडून या विधानसभेवर दावा केल्याने या ठिकाणी जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यास आग्रेही असल्याच्या चर्चा बाहेर आल्या होत्या. त्या अनुषंगाने या गटाकडून तयारी ही चालू केली आहे.याच रेसमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्राचार्य मोहन मोरे यांनी आपले नशीब आजमावण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू केले आहेत. याला संघटनेकडून चांगला प्रतिसाद मिळत असून विविध सामाजिक उपक्रम, संघटनात्मक बांधणी, पक्षांचे मोर्चे, आंदोलने मेळावे यात मोरे सक्रिय झालेले आहेत. नुकत्याच महागाव नगरपंचायतच्या सत्तांतरामध्ये शिवसेनेला सत्तेत बसविण्यात मोरे यांचे मोलाचे योगदान असल्याचे बोलले जाते. शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेले व सोज्वळ, सामंजस व उच्चविद्याविभूषित असलेले मोरे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून रिंगणात उतरले तर त्यांचेही आव्हान विरोधकांना स्विकारावे लागेल. तसेच याच गटात भिमराव भालेराव सुध्दा उमेदवारी साठी आग्रही आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढल्यास दत्तात्रय गंगासागर हे शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असतील हे निश्चित.या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिकाही तितकीच महत्वाची ठरेल. कारण गत अनेक निवडणुकांमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने जातीय मतांचा एकगठ्ठा करत काँग्रेसला विजयापासून रोखले आहे. उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजनांची सं‘या मोठी असून हे मते मिळवण्यास वंचित नेहमी यशस्वी राहिली आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी यवतमाळातील वंचितचे कार्यकर्ते आणि युवकांत क्रेझ असलेले डॉ. नीरज वाघमारे यांचा चेहरा या ठिकाणी वापरून आपला मतधिक्य वाढविण्याचा प्रयत्न करु शकेल. बहुजनांसह इतर हिंदू-मुस्लिम व अन्य जाती धर्माच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात वाघमारे सक्रिय असल्याने बहुजन मतासह इतर समाजांच्या मतांची मोट बांधण्यास वाघमारे यशस्वी होऊ शकतात. तेलंगणचे विकास मॉडेल घेऊन महाराष्ट्रात पाय पसरू पाहणार्या केसीआर ची बीआरएस ही या निवडणूकीत गुंज येथील संतोष कांबळे यांना आपला उमेदवार घोषीत करुन राजकीय गोंधळ निर्माण करण्याची शक्यता आहे.हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राजकारणात पुन्हा एकदा सकि‘य झालेली मनसे हिंदुत्ववादी मतांवर आपली पकड निर्माण करु शकते. मात्र मनसेकडे सद्यस्थितीत सक्षम उमेदवार नसल्याने विधानसभेच्या रणधुमाळीत असंतुष्ट व बंडखोर असलेल्या नाराज असलेल्या एखाद्या इच्छुक उमेदवाराला या पक्षाची उमेदवारी मिळू शकते असा इतिहास यापूर्वीचा आहे.एकंदरीत सर्व पाहता उमरखेड विधानसभेवर पुन्हा एकदा भाजप आपलं वर्चस्व कायम ठेवेल का की काँग्रेस आपली नवी खेळी खेळून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यात कितपत यशस्वी ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.