राजस्थान पोलिसांची गजेंद्रसिंह शेखावतांना नोटीस

12 Oct 2023 17:34:23
- बँक खाते, आर्थिक व्यवहाराचा तपशील मागवला
 
जयपूर, 
जोधपूरचे खासदार आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री Gajendra Singh Shekhawat गजेंद्रसिंह शेखावत यांना राजस्थान पोलिसांनी त्यांची बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची माहिती मागविण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. अलिकडेच गजेंद्र सिंह शेखावत यांनी, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने आपल्याविरोधात काम केल्याचा आरोप केला होता.
 
 
Gajendra Singh Shekhawat
 
अशोक मुख्यमंत्री गहलोत यांनी, गजेंद्रसिंह शेखावत हे संजीवनी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. राजस्थान पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) या प्रकरणाचा तपास करत आहे. शेखावत यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांच्या जोधपूर येथील निवासस्थानी नोटीस पाठवण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्या बँक खात्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला आहे. त्यांना नोटीस पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे, याआधी त्यांना ना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते ना कोणतीही नोटीस देण्यात आली होती.
 
 
Gajendra Singh Shekhawat : गजेंद्रसिंह शेखावत यांनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत, आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. गहलोत यांच्यावर त्यांनी दिल्लीत मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. नोटीसद्वारे मागितलेली माहिती एसओजीकडे आधीच उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0